आपले केस छान लांबसडक, काळेभोर, जाड आणि सिल्की शाईनी (silky shiny hair) असावेत, असं बहुतांश मुलींना वाटतं.. एखादी लांब केसांची मुलगी समोरून गेली तरी नकळत हात आपल्या केसांकडे जातो आणि आपले केस असे लांबसडक का नाहीत, याचं वाईट वाटतं.. काहीही केलं तरी केस वाढतच नाहीत. केसांची वाढ जणू खुंटली आहे, असं अनेक जणींना वाटतं. तुमचंही तुमच्या केसांबाबत हेच मत असेल, केसांची वाढ खूपच हळूहळू होत असेल, तर हा सोपा घरगुती उपाय करून बघा. (home remedy for hair growth)
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये केसांची वाढ होण्यासाठी घरच्याघरी योग्य उपचार कसा करायचा हे दाखवलं आहे. हा उपाय म्हणजेच केसांसाठी घरच्याघरी करण्यात येणारं केरॅटिन ट्रिटमेंट आहे, असंही त्यात सांगितलं आहे. हा उपाय करण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ केसांच्या मुळांना पोषण देतात, स्काल्पचं रक्ताभिसरण वाढवतात. याच गोष्टी केसांची चांगली वाढ होण्यासाठी उपयोगी ठरतात. यासाठी एक खास हेअर जेल कसं तयार करायचं हे या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे..
कसं तयार करायचं हेअर जेल- यासाठी सगळ्यात आधी एक ग्लास पाणी एका पातेल्यात घ्या आणि ते गॅसवर उकळत ठेवा.- या पाण्यात ३ टीस्पून जवस टाका.- जोपर्यंत पाणी हाताला थोडंसं चिकट लागत नाही, तोपर्यंत ते उकळू द्या. - पाण्याला चिकटपणा आला की नाही ते एकदा तपासा आणि त्यानंतरच ते पाणी दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्या.- या पाण्यात आता ३ टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि १ टीस्पून कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल टाका.- हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. कोमट झालं की केसांच्या मुळांना, संपूर्ण केसांना लावा.- यानंतर अर्ध्या तासाने केस नेहमीप्रमाणे शाम्पू करून धुवून टाका. - आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास केसांची वाढ तर चांगली होईलच पण केस अधिक मऊ, चमकदार आणि सिल्की होतील.