अनेक जणींची दिवाळीची (skin care routine for diwali) काम संपता संपत नाहीत. वर्किंग वुमन असेल, तर त्यांची तर आणखीनच धावपळ असते. घरीही कामाचा खूप लोड असतो, शिवाय ऑफिसचं कामही वाढलेलं असतं. आवराआवरी, खरेदी, फराळ, घराची सजावट एवढं सगळं बघत असताना मग स्वत:कडे बघायला वेळच मिळत नाही. पार्लरमध्ये निवांत जाऊन क्लिनअप, फेशियल (cleanup and facial) करणं होतच नाही. अशा वेळी मग ऐन दिवाळीत आपला चेहरा डल, निस्तेज दिसू लागतो. असं होऊ नये, म्हणून दिवाळीच्या दिवशी मेकअप करण्यापुर्वीची फक्त ५ ते १० मिनिटं स्वत:साठी द्या. चेहरा छान खुलून येईल आणि चमकदार (instant home made scrub for glowing skin) दिसेल.
कसं करायचं होममेड स्क्रब?
१. हा उपाय इन्स्टाग्रामच्या nemat.khana या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
२. यासाठी आपल्याला २० ग्रॅम प्लेन ओट्स, २० ग्रॅम मसूर डाळ, २० ग्रॅम बासमती तांदूळ आणि हळकुंडाचा एक छोटासा तुकडा लागणार आहे.
सुहाना शाहरुख खानची लावणी स्टाइल डिझायनर साडी, पण लोक का तिला नावे ठेवत आहेत?
३. आता वरील सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या. तुमचं होममेड स्क्रब किंवा उटणं झालं तयार.
कसं लावायचं हे उटणं /स्क्रब?
१. ज्यांना पिंपल्स येण्याचा त्रास आहे त्यांनी हे उटणं किंवा स्क्रब कालविण्यासाठी कच्चं दूध वापरावं.
२. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी स्क्रब कालविण्यासाठी गुलाब पाणी वापरावं.
कुरकुरीत भावनगरी शेव! चवीला एकदम खमंग, करायला अगदी सोपी आणि टिकेलही महिनाभर
३. ज्यांना वरीलपैकी कोणताही त्रास नसेल, तसेच त्यांचा स्किनटोन नॉर्मल प्रकारात येणारा असेल, त्यांनी साधं पाणी टाकून स्क्रब भिजवलं तरी चालेल.
४. तुमच्या आवडीनुसार हे स्क्रब कालवून घ्या. चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने ५ ते ७ मिनिटे मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायझर लावा. चेहरा छान उजळेल, चमकेल आणि मेकअपही चांगला बसेल.