केस सुंदर करण्याचा एकच मार्ग तो म्हणजे शाम्पू आणि कंडिशनर. पण कितीही महागडे शाम्पू वापरले तरी कोरडे- रुक्ष केस, केस तुटणे, डोक्यात खाज, कोंडा या समस्या आहे तशाच राहातात. केसांच्या या समस्यांवर विकतेचे महागडे शाम्पू नाही तर घरी तयार केलेला कोरफडीचा शाम्पू असरदार ठरतो असं सौंदर्यतज्ज्ञ पूजा गोयल म्हणतात. घरी तयार केलेल्या कोरफडीच्या शाम्पूनं केस मऊ-मुलायम, दाट आणि लांबही होतात. तसेच या शाम्पूनं केसांना चमकही येते. पूजा गोयल कोरफडीचा शाम्पू घरी तयार करण्याची सोपी पध्दतही सांगतात.
Image: Google
कोरफडीचा शाम्पू कसा तयार करणार?
कोरफडचा शाम्पू तयार करण्यासाठी 1 कप पाणी, 1 चमचा कोरफडचा गर, 1 चमचा पर्ली काॅन्सन्ट्रेट शाम्पू किंवा कोणताही हर्बल शाम्पू, 1 ते 2 ई व्हिटॅमिन्स कॅप्सूल , 1 छोटा चमचा बदाम तेल/ जोजोबा तेल घ्यावं.
Image: Google
कोरफडचा शाम्पू तयार करण्यासाठी एका मोठ्या वाटीत 1 कप पाणी घ्यावं. त्यात 1 चमचा कोरफडचा गर , 1 चमचा पर्ली काॅन्सन्ट्रेट शाम्पू किंवा हर्बल शाम्पू घालावा. हे मिश्रण चांगल्ं हलवून घ्यावं. एक तास हे मिश्रण तसंच ठेवावं. नंतर यात 2 व्हिटॅमिन्स कॅप्सूल कापून टाकाव्यात. केस खूपच कोरडे असल्यास 1 छोटा चमचा बदाम तेल घालावं. हे मिश्रण चांगलं मिसळून घ्याव. केसांवर आधी पाणी घेऊन केस ओले करावेत. मग हा कोरफड शाम्पू केसांच्या मुळापासून खालच्या टोकापर्यंत नीट लावावा. तो थोडावेळ केसांवर राहू द्यावा. नंतर केस पाण्यानं स्वच्च धुवावेत. हा शाम्पू लावल्यानंतर केसांना दुसरं काही लावण्याची गरज नसते. पण जर केसांना कंडिशनर लावायची गरज वाटल्यास थोडा कोरफडचा गर घ्यावा. तो केसांवर हलक्या हातानं घासून लावावा. 2-3 मिनिटांनी केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत.
Image: Google
घरी तयार केलेल्या कोरफडच्या शाम्पूचे फायदे
1. घरी तयार केलेला कोरफडचा शाम्पू केसांना लावल्यास केसांमध्ये नैसर्गिक ओलावा निर्माण होतो. यामुळे केस कोरडे होत नाही. केस गळती थांबते.
2. केस वाढवण्याची इच्छा असल्यास घरी तयार केलेला कोरफडचा शाम्पू वापरावा. घरी तयार केलेल्या कोरफडच्या शाम्पूत अ आणि ई जीवनसत्वं असतात. या दोन जीवनसत्वांमुळे केस वाढण्यास चालना मिळते.
Image: Google
3. कोरफडच्या शाम्पूनं केसांच्या मुळाशी ओलावा निर्माण होतो. यामुळे केसात कोरडेपणा येऊन कोंडा होण्याची, खाज येण्याची समस्या दूर होते. कोरफडच्या गरात ॲण्टिऑक्सिडण्टस आणि जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. हे गुणधर्म कोंडा निर्माण करणाऱ्या घटकांना विरोध करतात.
4. कोरफडच्या गरात ई जीवनसत्व असतं. तसेच कोरफडचा शाम्पू तयार करताना त्यात ई व्हिटॅमिन्सच्या कॅप्सूल टाकल्याने या शाम्पूतून केसांना आवश्यक ई जीवनसत्व मिळतं. यामुळे केसांचं योग्य पोषण होऊन केस मऊ मुलायम आणि चमकदार होतात. होतात. कोरफडचा घरी तयार केलेला शाम्पू वापरल्यास केसांचं योग्य कंडिशनिंग होवून केस सुंदर होतात.