Lokmat Sakhi >Beauty > आता घरीच बनवा गुलाबाच्या पाकळ्यांचा लिप बाम, ओठ होतील सुंदर-गुलाबी

आता घरीच बनवा गुलाबाच्या पाकळ्यांचा लिप बाम, ओठ होतील सुंदर-गुलाबी

Now make rose petal lip balm at home, lips will be beautiful-pink ओठांना लिपस्टिक लावून ओठ काळे झाले असतील तर ट्राय करा हा घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 06:30 PM2023-03-15T18:30:53+5:302023-03-15T18:32:06+5:30

Now make rose petal lip balm at home, lips will be beautiful-pink ओठांना लिपस्टिक लावून ओठ काळे झाले असतील तर ट्राय करा हा घरगुती उपाय

Now make rose petal lip balm at home, lips will be beautiful-pink | आता घरीच बनवा गुलाबाच्या पाकळ्यांचा लिप बाम, ओठ होतील सुंदर-गुलाबी

आता घरीच बनवा गुलाबाच्या पाकळ्यांचा लिप बाम, ओठ होतील सुंदर-गुलाबी

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. टॅनमुळे त्वचा काळपट पडते. हा काळपटपण सहसा लवकर निघत नाही. त्वचेसह आपले ओठ देखील काळे पडतात. काळपट ओठ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. बहुतांशवेळा ओठ लिपस्टिकच्या अतिवापरामुळे काळपट पडतात. लिपस्टिकमधील रासायनिक घटकांमुळे ओठांची त्वचा काळी पडते. हा काळपटपणा लवकर निघत नाही.

अनेकांना आपले ओठ गुलाबी असावे असे वाटते. ओठांची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे ओठांची काळजी घेणं गरजेचं आहे. गुलाबी ओठांसाठी आपण गुलाबांच्या पाकळ्यांचा वापर करून लिप बाम बनवू शकता. या सुंदर फुलाच्या पानांमध्ये अनेक सौंदर्य आणि आरोग्य फायदे आहेत. ज्यामुळे आपले ओठ गुलाबी तर दिसतीलच यासह ओठांना नैसर्गिक रंग येईल(Now make rose petal lip balm at home, lips will be beautiful-pink).

फक्त ३ गोष्टी वापरून घरीच करा लिपमास्क, ओठ होतील गुलाबी मऊ सुंदर

गुलाब पाकळ्यांचा लिप बाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य

गुलाबाच्या पाकळ्या

खोबरेल तेल

पेट्रोलियम जेल

व्हिटॅमिन सीचे महागडे फेसपॅक वापरता? त्यापेक्षा पपई खा आणि पपईच्या सालांचा करा फेसपॅक, पाहा इफेक्ट

लिप बाम बनवण्याची कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये गुलाबाच्या पाकळ्या घ्या. त्या पाकळ्यांना पाण्याने धुवा. आता हे पाकळ्या खलबत्यात घाला, व खलबत्याच्या मदतीने पाकळ्यांची पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर हे मिश्रण बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात खोबरेल तेल, पेट्रोलियम जेल घेऊन मिक्स करा.

फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग

दुसरीकडे एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मिश्रण असलेला बाऊल ठेवा. २ मिनिटे पाण्यावर हे मिश्रण गरम करा. सतत चमच्याने हलवत राहा. आता एका काचेची डबी घ्या, त्यात चहाच्या गाळणीमध्ये मिश्रण ओता, व त्यातून मिश्रणाचा रस काढा. रस डब्यात साठवून फ्रिजमध्ये ठेवा.

कोरफडीच्या गरात ५ गोष्टी मिक्स करा आणि पाहा चेहऱ्यावर नितळ जादू ! पिंपल्सचा त्रास कमी..

मिश्रण सेट झाल्यानंतर बाहेर काढा. आता हा गुलाब पाकळ्यांचा लिप बाम वापरण्यासाठी रेडी. आपण याचा वापर दररोज करू शकता, याच्या वापरामुळे ओठांवरील काळपटपणा निघून जाईल, यासह मुलायम होतील.  

Web Title: Now make rose petal lip balm at home, lips will be beautiful-pink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.