शरीरात कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता भासल्यास त्याचा नकारात्मक परिणाम शरीरावर दिसायला लागतो. अशा खाण्यापिण्यात काही सुधारणा केल्यास केस आणि नखांच्या आरोग्याला बरेच फायदे मिळतात. न्युट्रिशनिस्ट सिमरन कथुरिया यांचेसुद्धा हेच म्हणणे आहे. (Hair Care Tips) न्युट्रिशनिस्ट सांगतात की घरी हे लाडू तयार केल्यानं नखं मजबूत होतात आणि ज्यामुळे केसांची वाढ वेगानं होते. न्युट्रिशनिस्ट सिमरन कथुरीया हे सांगतात की लाडू पोषक तत्वांचा पॉवरहाऊस आहे. लाडू तयार करण्याच्या सोप्या पद्धती समजून घ्यायला हव्यात. केस आणि नखं वाढण्यासाठी हे लाडू फायदेशीर ठरतात. (Nutritionist Tells How to Make Laddu For Hair Growth And Strong Hair Hair Care Tips)
हे लाडू करण्यासाठी तुम्हाला १ कप भोपळ्याच्या बीया, १ कप पिस्ता, २ कप नारळ, २ चमचे शेवग्याच्या पानांची पावडर, ३ चिमूट वेलची पावडर आणि १ कप मनुक्यांची आवश्यकता असेल. लाडू करण्यासाठी एक कढईत किसलेलं नारळ, पिस्ता आणि बारीक केलेल्या बीया भाजून घ्या. नंतर या वेगळ्या काढा. मनुके भाजून घ्या. त्यात मोरिंगा पावडर आणि वेलचची घालून हे साहित्य मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. मिश्रण हाताने एकजीव करून त्याला लाडू सारखा आकार द्या. तयार आहेत. नारळाचे लाडू. हे लाडू केस वाढवण्यासाठी तसंच नखं वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढतील ही पानं, रोज १ पान चावून खा, सद्गुरूंनी सांगितले फायदे
आहारतज्ज्ञ सांगतात की हे लाडू वळताना मध्यम किंवा लहान आकाराचे वळा जास्त मोठे वळू नका. जेणे करून रोज तुम्ही १ ते २ लाडू खाऊ शकतात. या लाडूंमध्ये नारळ असते जे हेल्दी फॅट्सने परिपूर्ण आहे ज्यामुळे केस आणि नखं हायड्रेट राहण्यास मदत होते. पिस्ता बायोटीनचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय ओमेगा३ आणि ओमेगा ६ फॅटी एसिड्ससोबतच व्हिटामीन ई चा चांगला स्त्रोत आहे.
पिस्त्यात बायोटीनचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय ओमेगा३, ओमेगा ६ फॅटी एसिड्ट्स असतात. यामुळे केस मोठे, लांबसडक होतात. मोरींगाच्या पानांमध्ये व्हिटामीन सी, व्हिटामीन बी कॉम्पलेक्स, अमिनो एसिड्स, आयर्न, जिंक, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, सिलिका, ओमेगा ३ आणि ओमेगा ४ फॅटी एसिड्स असतात.