Lokmat Sakhi >Beauty > तेल १ पण फायदे ६, केसांपासून त्वचेपर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी एरंडेल तेल, नक्की वापरायचं कसं पाहा..

तेल १ पण फायदे ६, केसांपासून त्वचेपर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी एरंडेल तेल, नक्की वापरायचं कसं पाहा..

Castor Oil Benefits एरंडेल तेलाचे अनेक फायदे आहेत, ते कधी कसं वापरायचं हे फक्त नीट समजून घ्यायला हवं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 01:46 PM2023-01-16T13:46:03+5:302023-01-16T13:47:30+5:30

Castor Oil Benefits एरंडेल तेलाचे अनेक फायदे आहेत, ते कधी कसं वापरायचं हे फक्त नीट समजून घ्यायला हवं.

Oil 1 but benefits 6, see how to use castor oil for many problems from hair to skin. | तेल १ पण फायदे ६, केसांपासून त्वचेपर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी एरंडेल तेल, नक्की वापरायचं कसं पाहा..

तेल १ पण फायदे ६, केसांपासून त्वचेपर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी एरंडेल तेल, नक्की वापरायचं कसं पाहा..

कॅस्टर ऑईल ज्याला एरंडेल तेल असे देखील म्हणतात. या तेलाचे अनेक फायदे आहेत. आपल्या शरीरातील विविध अवयवांवर हे तेल काम करते. आपल्या घरातील मोठ्या लोकांनी नेहमीच आपल्याला एरंडेल तेलाच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे.  एरंडेल तेलामध्ये फॅटी आणि रिसिनोलिक अॅसिड असते. चेहऱ्यावरील कोरडी त्वचा गुळगुळीत करण्यास आणि मॉइश्चराइझ करण्यास हे तेल मदत करते. वैद्यकीय उपचारांसाठीही या तेलाचा वापर केला जातो. एरंडेल तेल आपल्या आरोग्य आणि त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मॉइश्चरायझर म्हणून करते काम

चेहरा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर केला जातो. यासाठी एरंडेल तेलाचा वापर करू शकता. सर्वप्रथम, एरंडेल तेलाचे १ ते २ थेंब घेऊन ते बोटांवर पसरवा, त्यानंतर चेहऱ्यावर आणि मानेला लावा. आपण एरंडेल तेल मॉइश्चरायझरसह मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघण्यास मदत मिळते.

लिप बाम

एरंडेल तेलापासून आपण लिप मॉइश्चरायझर तयार करू शकता. यासाठी मेण, १ चमचा एरंडेल तेल, १ चमचा खोबरेल तेल आणि अर्धा चमचा कोरफड जेलची आवश्यकता आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. हे बाम दररोज आपल्याला ओठांना लावा. हे ओठांना आर्द्रता, हायड्रेटेड आणि नैसर्गिकरित्या गुलाबी ठेवण्यास मदत करेल.

काळया डागांवर प्रभावी

चेहऱ्यावरील काळ्या डागांवर एरंडेल तेल लावल्याने फरक दिसले. यासाठी एरंडेल तेलाचे काही थेंब आणि खोबरेल तेल मिक्स करा. मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावरील प्रभावित भागावर लावा. काळे डाग दूर करण्यासाठी नारळाच्या तेलासह एरंडेल तेल उत्तम काम करते. हे तेल डार्क सर्कलवरही लावता येईल. याने चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होईल.

अँटी-एजिंगवर करते काम

आपण जर कमी वयात अँटी-एजिंगला सामोरे जात असाल तर, एरंडेल तेलाचा वापर करा. एरंडेल तेल नियमित वापरल्याने चेहरा नेहमी ग्लो करेल. यासह चेहऱ्याला मॉइश्चरायझ, सुरकुत्या व बारीक रेषा दूर ठेवण्यास मदत करते. एरंडेल तेल व इतर कोणतेही तेल मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. रोज मसाज करावे, याने चेहऱ्याला नवी चमक मिळेल.

केस गळती रोखण्यासाठी मदत

केस गळती थांबवण्यासाठी यासह वाढीसाठी एरंडेल तेलाचा वापर केला जातो. १ चमचा एरंडेल तेल आणि एक चमचा ऑलिव्ह तेल एकत्र मिसळा. तेल हलके गरम करा आणि संपूर्ण केसांना मसाज करा. आपण हे आठवड्यातून 2 वेळा करू शकता. याने केसांची मुळे मजबूत होते आणि केसांच्या वाढीस मदत करते.

बॉडी मसाज

एरंडेल तेल बॉडी मसाजसाठी उत्तम मानले जाते. हे तेल शरीरातील कोणत्याही अवयवातील वेदना दूर करण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी एरंडेल तेल गरम करा. आपण यात लॅव्हेंडर अथवा खोबरेल तेल मिक्स करू शकता. आपण या तेलाने संपूर्ण शरीराला मसाज देऊ शकता.

Web Title: Oil 1 but benefits 6, see how to use castor oil for many problems from hair to skin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.