Lokmat Sakhi >Beauty > Grey Hair Problem : केस जास्तच पांढरे व्हायला लागलेत? ३ प्रकारे लावा तिळाचं तेल आणि कढीपत्त्याचा खास फॉर्म्युला, केस राहतील काळेभोर

Grey Hair Problem : केस जास्तच पांढरे व्हायला लागलेत? ३ प्रकारे लावा तिळाचं तेल आणि कढीपत्त्याचा खास फॉर्म्युला, केस राहतील काळेभोर

Oil For Grey Hair To Black : काळ्या केसांसाठी तिळाचे तेल मेहेंदीमध्ये मिसळून लावल्यास त्याचा परिणाम दिसून येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:05 AM2022-05-31T11:05:00+5:302022-05-31T13:43:14+5:30

Oil For Grey Hair To Black : काळ्या केसांसाठी तिळाचे तेल मेहेंदीमध्ये मिसळून लावल्यास त्याचा परिणाम दिसून येईल.

Oil For Grey Hair To Black : Hair care tips apply sesame oil on successful hair benefits of applying sesame oil on hair | Grey Hair Problem : केस जास्तच पांढरे व्हायला लागलेत? ३ प्रकारे लावा तिळाचं तेल आणि कढीपत्त्याचा खास फॉर्म्युला, केस राहतील काळेभोर

Grey Hair Problem : केस जास्तच पांढरे व्हायला लागलेत? ३ प्रकारे लावा तिळाचं तेल आणि कढीपत्त्याचा खास फॉर्म्युला, केस राहतील काळेभोर

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये आपली त्वचा आणि केसही असतात. केसांमुळे आपल्याला सौंदर्य मिळते आणि आपल्या चेहऱ्याची चमक आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतात, परंतु आपल्या जीवनशैलीचा आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो. ज्याची तणाव, चिंता आणि इतर अनेक कारणे आहेत. (Hair Care Tips) ज्यामुळे केस खराब होतात, पांढरे होऊ लागतात. अशा स्थितीत आपण आपल्या केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. या लेखात केस काळे करण्याचे घरगुती उपाय  सांगणार आहोत. (Hair care tips apply sesame oil on successful hair benefits of applying sesame oil on hair) जेणेकरून  पार्लरमध्ये पैसे न घालवता तुम्ही घरच्याघरी काळेभोर केस मिळवू शकता.

१) मेहेंदीत मिसळा तिळाचं तेल

काळ्या केसांसाठी तिळाचे तेल मेहेंदीमध्ये मिसळून लावल्यास त्याचा परिणाम दिसून येईल. मेहेंदी हा एक नैसर्गिक केसांचा रंग आहे आणि त्याचा वापर केल्याने केस तपकिरी किंवा लाल होतात, म्हणून त्यात तिळाचे तेल घातल्याने केसांना नैसर्गिक रंग येतो आणि ते गडद होतात.

२) तिळाच्या तेलानं मसाज करा

तिळाचे तेल केसांसाठी फायदेशीर आहे, याने मसाज केल्याने केस चांगले होतात. मसाज केल्याने, पोषण टाळूपर्यंत पोहोचते, ज्यामुळे केसांचा पोत सुधारतो. तसेच डोक्यात रक्ताभिसरण वाढते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई केस लवकर काळे होण्यास मदत करते. अशावेळी त्याचा वापर करणे फायदेशीर ठरते.

३) कढीपत्ता आणि तिळाच्या तेलाचं मिश्रण

तिळाच्या तेलात आढळणारे अमिनो अॅसिड केसांसाठी फायदेशीर असतात. तिळाच्या तेलात शिजवलेला कढीपत्ता लावल्यास खूप फायदेशीर ठरतो कारण त्यामुळे केसांची आर्द्रता वाढते तसेच त्यांची वाढ होण्यास मदत होते.

Web Title: Oil For Grey Hair To Black : Hair care tips apply sesame oil on successful hair benefits of applying sesame oil on hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.