Lokmat Sakhi >Beauty > केसगळती-डोक्यात कोंडा आणि जखमाही? ५ पदार्थ खा- मिळेल ओमेगा -३ फॅटी ॲसिड- केस मजबूत...

केसगळती-डोक्यात कोंडा आणि जखमाही? ५ पदार्थ खा- मिळेल ओमेगा -३ फॅटी ॲसिड- केस मजबूत...

Omega 3 Fatty Acid Helps In Hair Growth : The benefits of Omega-3 for your hair : Omega-3 for Hair Growth : केसांचे चांगले आरोग्य चांगले राहावे म्हणून खा ओमेगा - ३ फॅटी ॲसिड असलेले ५ पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2024 07:19 PM2024-11-21T19:19:25+5:302024-11-21T19:32:20+5:30

Omega 3 Fatty Acid Helps In Hair Growth : The benefits of Omega-3 for your hair : Omega-3 for Hair Growth : केसांचे चांगले आरोग्य चांगले राहावे म्हणून खा ओमेगा - ३ फॅटी ॲसिड असलेले ५ पदार्थ...

Omega 3 Fatty Acid Helps In Hair Growth The benefits of Omega-3 for your hair Omega-3 for Hair Growth | केसगळती-डोक्यात कोंडा आणि जखमाही? ५ पदार्थ खा- मिळेल ओमेगा -३ फॅटी ॲसिड- केस मजबूत...

केसगळती-डोक्यात कोंडा आणि जखमाही? ५ पदार्थ खा- मिळेल ओमेगा -३ फॅटी ॲसिड- केस मजबूत...

काळेभोर, जाड, घनदाट केस प्रत्येकीलाच आवडतात. सुंदर केस आपल्या सौंदर्यात अधिक भर पाडतात. परंतु सध्याची बदलती लाइफस्टाइल, वातावरण, धूळ. प्रदूषण, पोषक तत्वांची कमतरता यांसारख्या अनेक कारणांमुळे केसांच्या अनेक समस्या सतावू लागतात. केस पातळ, कोरडे, निर्जीव होणे ही केसांच्या बाबतीतील अतिशय कॉमन समस्या आहे. केस पातळ ( The benefits of Omega-3 for your hair) होऊन तुटू लागतात, असे केस निर्जीव, रुक्ष, कोरडे दिसू लागतात. पातळ आणि सतत गळणाऱ्या केसांवर आपण अनेक प्रकारचे उपायही करुन पाहतो. परंतु जर आपल्या शरीरात आवश्यक त्या पोषक तत्वांची कमतरता असेल तर केसांसाठी शाम्पू, तेल असे अनेक उपाय करूनही काही उपयोग होत नाही(Omega-3 for Hair Growth).

शरीरात कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता असल्यास त्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावरही होतो. केस गळणे आणि पातळ होणे हे शरीरात ओमेगा - ३ फॅटी ॲसिडची कमतरता दर्शवते. शरीरात ओमेगा - ३ फॅटी ॲसिडची कमतरता असल्यास केसांशी संबंधित अनेक समस्या डोकं वर काढतात. केस गळणे, पातळ होणे, वारंवार केस तुटणे, केसांची वाढ न होणे यांसारख्या केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ओमेगा - ३ फॅटी ॲसिडची कमतरता भरुन काढणे आवश्यक असते. केसांचे चांगले आरोग्य आणि वाढीसाठी ओमेगा - ३ फॅटी ॲसिड कसे महत्वाचे आहे? तसेच ओमेगा - ३ फॅटी ॲसिड असणारे कोणते पदार्थ खाणे आवश्यक आहे ते पाहूयात(Omega 3 Fatty Acid Helps In Hair Growth).

ओमेगा - ३ फॅटी ॲसिड केसांसाठी महत्वाचे का आहे ?   

१. ओमेगा - ३ फॅटी ॲसिड केसांसाठी महत्वाचे कारण, यामुळे स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते. यामुळे केसांचे क्यूटिकल मजबूत होतात, केस चमकदार आणि मऊ होतात. 

२. ओमेगा -३ फॅटी ॲसिड केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी फार फायदेशीर असतात, त्याच्या कमतरतेमुळे केस कोरडे आणि निर्जीव बनतात, ज्यामुळे केसगळती, केस तुटणे, पातळ होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. 

३. ओमेगा - ३ फॅटी ॲसिड केसांची गुणवत्ता सुधारतात, ज्यामुळे केस जाड, मजबूत आणि घनदाट दिसतात. ओमेगा - ३ फॅटी ॲसिड केसांच्या वाढीस देखील प्रोत्साहन देते, ज्यामुळे केस जलद वाढू लागतात. 

हिवाळ्यात वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, त्वचा कोरडी रखरखीत होण्याचा धोका टाळा...

केसांच्या वाढीसाठी ओमेगा - ३ फॅटी ॲसिडयुक्त कोणते पदार्थ खावेत? 

१. तुपामध्ये ओमेगा - ३ फॅटी ॲसिड असते, रोजच्या आहारात तुपाचा समावेश केल्याने केस मजबूत होतात.

२. याशिवाय ऑलिव्ह ऑइलमध्ये ओमेगा - ३ आणि अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात असतात जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी पडते? ‘या’ ३ चुका तुम्ही हमखास करताय...

३. केसांचे आरोग्य आणि चांगल्या वाढीसाठी आपण बदाम खाऊ शकता, बदामामध्ये ओमेगा- ३ तसेच व्हिटॅमिन 'ई' असते जे केसांना पोषण देते आणि त्यांना मजबूत बनवते.

४. अक्रोडमध्ये ओमेगा -  ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यात बायोटिन देखील असते जे केसांचे आरोग्य सुधारते.

५. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा - ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे केसांना पोषण देते आणि त्यांना गळण्यापासून प्रतिबंधित करते.
या व्यतिरिक्त, चिया सीड्स ओमेगा - ३ फॅटी ॲसिडचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. रोजच्या आहारात तुम्ही अळशी आणि चिया सीड्सचा वापर करुन केसांचे आरोग्य सुधारु शकता.

Web Title: Omega 3 Fatty Acid Helps In Hair Growth The benefits of Omega-3 for your hair Omega-3 for Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.