आजकाल प्रत्येकाच्याच केसांच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. धुळ- प्रदुषण यांचा आपल्या केसांना वारंवार सामना करावा लागतो. शिवाय आहारातून प्रत्येकवेळी केसांना काहीतरी पोषक (healthy oil for hair) मिळेलच असं नसतं. शिवाय रात्रीची जागरणं, व्यायामाचा अभाव, आहारात खूप जास्त मीठ आणि मसाले असणं या सगळ्या गोष्टी केसांचं नुकसान करणाऱ्या आहेत. त्यामुळेच तर हल्ली केसांमध्ये सारखा- सारखा कोंडा (dandruff in hair) होणे, केस खूपच जास्त गळणे किंवा कमी वयातच पांढरे (gray hair) होऊ लागणे, ड्राय होणे अशा समस्या वाढत चालल्या आहेत. या सगळ्या समस्यांवर एक सोपा आणि घरगुती उपाय (home remedies) म्हणजे कोरफडीचं तेल. (aloevera oil)
आपल्याकडे फार पुर्वीपासूनच कोरफडीला खूप जास्त महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने कोरफड जशी महत्त्वाची आहे, तशीच ती सौंदर्याच्या दृष्टीनेही अतिशय खास मानली जाते. म्हणूनच तर त्वचेच्या अनेक विकारांवर तसेच केसांच्या अनेक समस्यांवर कोरफडीचा वापर केला जातो. केसांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर कोरफडीच्या तेलाचा वापर करा. कोरफडीचं तेल घरीच बनवता येतं. फक्त त्यासाठी आपल्याला थोडा वेळ काढायला हवा आणि हा उपाय काही आठवडे तरी नियमित करायला हवा. केसांना महिनाभर जरी नियमित कोरफडीचं तेल लावलं तरी अतिशय चांगला परिणाम दिसून येतो. म्हणूनच तर बघा कशा पद्धतीने तयार करायचं कोरफडीचं तेल आणि कसा करायचा त्याचा केसांसाठी वापर. हा उपाय इन्स्टाग्रामच्या myplantstory2021 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
केसांसाठी कोरफडीचे फायदे - कोरफडीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे स्काल्पवर असलेलं कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी कोरफड अतिशय फायद्याची ठरते.- त्यामुळे केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी किंवा डोक्यात वारंवार खाज येत असेल, केसांचा कुबट वास येत असेल तर असा त्रास कमी करण्यासाठीही कोरफड उपयुक्त ठरते.- कोरफडीमुळे डोक्याच्या त्वचेचं इन्फेक्शन कमी होत असल्याने आपोआपच केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळणं कमी हाेतं.- कोरफडीमध्ये व्हीटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या कोरफडीच्या नियमित वापराने कमी होते.- कोरफडीचं तेल म्हणजे केसांसाठी एक उत्तम टॉनिक आहे.
कसं तयार करायचं कोरफडीचं तेल - कोरफडीचं तेल तयार करण्यासाठी सगळ्यात आधी कोरफड झाडापासून कापून घ्या आणि जो कापलेला भाग आहे तो भाग पाण्यात बुडेल, अशा पद्धतीने एका ग्लासभर पाण्यात १० मिनिटे उभी करून भिजत ठेवा. - १० मिनिटांनंतर कोरफडीचा सगळा पिवळा भाग ग्लासमध्ये उतरून गेलेला दिसेल.- आता कोरफडीचे बारीक बारीक तुकडे करा. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात ७ ते ८ तास पाण्यात भिजवलेले मेथीचे दाणे टाका. हे मिश्रण मिक्सरमधून काढून त्याची चांगली पेस्ट करून घ्या.- आता एक कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात ही पेस्ट टाका. जेवढी पेस्ट असेल तेवढंच नारळाचं तेल टाका.- हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करा आणि उकळू द्या. जेव्हा कोरफडीच्या पेस्टचा हिरवा रंग बदलून काळपट चॉकलेटी होईल तेव्हा गॅस बंद करा. तेल थंड झालं की गाळून घ्या.- हे ते आठवड्यातून दोन वेळा केसांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. १ महिना नियमितपणे हा उपाय केल्यास केसांचं गळणं निश्चितच कमी होईल.