तरुण वर्गात केसांच्या संबंधित समस्या सर्रास दिसून येते. केस गळणे, केस पिकणे, केसांमध्ये कोंडा तयार होणे, टक्कल पडणे अशा व अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. याचं मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली. शरीराला संतुलित आहार मिळत नसल्यामुळे केसांच्या निगडित समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी अनेक लोकं कांद्याच्या रसाचा वापर करतात. हा उपाय लोकप्रिय असून, बरेच लोकं याचा वापर करतात. मात्र, हा उपाय खरंच उपयुक्त ठरतो का ? कांद्याच्या रसाने नवीन केसांच्या वाढीस चालना मिळते का ?
डीके पब्लिशिंग हाऊसच्या 'हीलिंग फूड्स' या पुस्तकानुसार, केसांच्या वाढीसाठी कांदा उपयुक्त आहे. कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते जे केस पातळ होण्यापासून वाचवते. केस पातळ होणे आणि तुटणे कमी झाल्याने केसांची वाढ झपाट्याने होईल. कांद्याच्या रसामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स केस गळणे थांबवते.
असा करा कांद्याच्या रसाचा वापर
सर्वप्रथम कांद्याचा रस तयार करा. केसांचे सेक्शन करा. कांद्याचा रस कॉटन बॉलच्या मदतीने केसांना लावा. ३ ते ४ कांद्याचा रस तसंच केसांवर ठेवा. त्यानंतर केस धुवून टाका. कांद्याचा रस नुसता पाण्याने धुता येणार नाही. त्यामुळे चांगला फ्रॅग्नसवाला शॅम्पू लावून तुम्ही केस स्वच्छ करुन घ्या. त्यामुळे तुमचे केस छान दिसतील.
कांद्याचा रस केसांवर लावण्याचे फायदे
कांद्यामध्ये सल्फर, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6 आणि पोटॅशिअम असते ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. त्यामुळे आठवड्यातून २ वेळा केसांवर कांद्याचा रस लावा.
१. केसांना येणारी खाज कमी करण्यासाठी कांद्याचा रस हा फायदेशीर ठरतो.
२. केसांच्या पोअर्समध्ये जाऊन केसांची वाढ होण्यास कांद्याचा रस मदत करते.
३. केसांना आलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी कांद्याचा रसा हा फार फायदेशीर ठरतो.
४. कोंड्यामुळे केस पातळ होत असेल तर कांद्याचा रस उपयुक्त ठरेल. त्याने कोंडा कमी करुन केस जाड होण्यास मदत मिळते.
५. केसांची वाढ जर थांबली असेल तर केसांची वाढ होण्यास मदत करते.