आजकाल प्रत्येक जण केसगळतीने त्रस्त आहे (Hair Care Tips). केस गळणे, कोंडामुळे केस कमकुवत होणे, केस अकाली पांढरे होणे अशा अनेक केसांच्या निगिडत समस्यांमुळे केस अधिक कमकुवत होतात. अशास्थितीत लोक महागडे उत्पादनांचा वापर करतात. पण यामुळे केसांचे अधिक नुकसान होऊ शकते (Onion Oil).
जर केसांचे अधिक नुकसान होऊ नये असे वाटत असेल तर, महागडे उत्पादने सोडा, कांद्याच्या तेलाचा वापर करा. रात्री झोपण्यापूर्वी केसांना कांद्याचे तेल लावा. कांद्याच्या तेलात आढळणारे पोषक तत्व केसांना मुळापासून मजबूत आणि निरोगी बनवतात. यामुळे केसांची पुन्हा वाढ होण्यास मदत होते. पण कांद्याच्या तेलाचे फायदे किती? यामुळे केस खरंच काळेभोर होतात? पाहूयात(Onion Hair Oil: Benefits, How To Use & Make One At Home).
पोट, मांड्या-दंड थुलथुलीत दिसतात? 'इवल्याशा' बिया कमी करू शकतात तुमचं वजन..पण कसे?
कांद्याचे तेल केसांसाठी फायदेशीर
कांद्याचे तेल केसांना मुळांपासून मजबूत करते आणि त्याच्या मदतीने रक्ताभिसरण व्यवस्थित होते. ज्यामुळे केस अधिक मजबूत होतात. ज्यामुळे काही दिवसात केस गळती थांबते. कांद्याच्या तेलात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असते. जे स्काल्पला पोषण देते.
केसांवर आठवड्यातून कांद्याचे तेल किती वेळा लावावे?
आपल्याला कांद्याचे तेल केसांवर रोज लावण्याची गरज नाही. आठवड्यातून एकदा ते वापरणे तुमच्या निरोगी केसांसाठी पुरेसे आहे. आठवड्यातून एकदा या तेलाने स्काल्पवर मसाज करा, आणि सकाळी केसांना शॅम्पू लावून धुवून घ्या. हे तेल केसांवर रात्रभर काम करते.
पोट - दंड आणि सीटचा भाग वाढला? दुपारी जेवताना ३ चुका टाळा; सुडौल व्हाल
कांद्याचे तेल कसे बनवायचे?
कांद्याचे तेल बनवण्यासाठी ५ कांदे बारीक करून त्याचा रस काढा. कांद्याच्या रसात अर्धा कप खोबरेल तेल मिसळा. आता २ लहान कांदे चिरून तेलात घाला. आता हे तेल गॅसवर ठेवा आणि थोडा वेळ शिजू द्या. थोड्यावेळानंतर भांडं गॅसवरून खाली ठेवा. थंड झाल्यानंतर गाळून तेल एका बॉटलमध्ये काढून ठेवा.