धुळ, प्रदुषण, आहारातून पुरेसं पोषण न मिळणं, केस धुण्याची- विंचरण्याची चुकीची पद्धत ही सगळी केस गळण्याची कारणं आहेत. पुरेशी स्वच्छता राखली गेली नाही आणि केसांची काळजी घेण्यात आपण कमी पडलो की केसांत कोंडा होतो, त्यामुळे आपोआपच केसांचं गळणं सुरू होतं. काही प्रसंगी केसांना फाटे फुटून (split hair) त्यांची वाढही खुंटते. असा सगळा त्रास थांबवायचा असेल तर केसांना योग्य पोषण मिळणं गरजेचं आहे. त्यासाठीच तर करून बघा हा साेपा उपाय. (Best home remedy to control hair fall)
केसांचं गळणं कमी करून त्यांची वाढ अधिक वेगाने होण्यासाठी कांदा वापरावा हे तर आपण जाणतोच. कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावणं ही केसांसाठी एक उत्तम ट्रिटमेंट आहे. आता कांद्याचा नुसताच रस लावण्यापेक्षा त्यापासून घरच्याघरी ऑनियन हेअर वॉश तयार करा आणि त्याने केस धुवून पहा. हा उपाय आठवड्यातून २ वेळा केल्यास अधिक चांगला फायदा दिसून येतो. हा उपाय इन्स्टाग्रामच्याbeautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला आहे. (how to reduce hair fall?)
कसं तयार करायचं ओनीयन हेअर वॉश?- कांदा चिरताना त्याची जी टरफलं आपण काढून टाकतो, ती आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापरायची आहेत. - कांद्याची ७- ८ टरफलं एका भांड्यात टाका. त्यात एक ग्लास पाणी टाका आणि ते उकळायला ठेवा.- उकळल्यानंतर एक ग्लास पाणी आटून जेव्हा पाऊण कप होईल, तेव्हा गॅस बंद करा.- पाणी गाळून एका बाऊलमध्ये काढून घ्या. - आता या पाण्यात १ टी स्पून टी ट्री एसेंशियल ऑईल किंवा रोझमेरी ऑईल आणि ३ टी स्पून तुमचा नेहमीचा शाम्पू टाका.- हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. त्याचा छान फेस होईल. हे झालं आपलं ओनीयन हेअर वॉश.- या हेअर वॉशचा उपयोग शाम्पूप्रमाणे करा आणि केस स्वच्छ धुवून घ्या.- चांगला परिणाम दिसून येण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हा उपाय करावा.
ऑनियन हेअरवॉश घेण्याचे फायदे (benefits of onion hair wash)- केसांचे गळणे कमी होते.- केसांची वाढ खूप पटापट होते.- कोंड्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.- केस चिकट, तेलकट होत असतील तर या उपायामुळे केस सिल्की होण्यास मदत होते.- चमकदार आणि दाट केस मिळविण्यासाठी उत्तम उपाय.