Lokmat Sakhi >Beauty > कांद्याच्या रसात फक्त 'या' २ गोष्टी मिसळा, केस होतील काळेभोर; दिसतील दाट- शायनी

कांद्याच्या रसात फक्त 'या' २ गोष्टी मिसळा, केस होतील काळेभोर; दिसतील दाट- शायनी

ONION JUICE FOR EXTREME HAIR GROWTH! and Grey Hairs : पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी एक सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 04:44 PM2024-10-14T16:44:27+5:302024-10-14T16:47:02+5:30

ONION JUICE FOR EXTREME HAIR GROWTH! and Grey Hairs : पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी एक सोपी ट्रिक

ONION JUICE FOR EXTREME HAIR GROWTH! and Grey Hairs | कांद्याच्या रसात फक्त 'या' २ गोष्टी मिसळा, केस होतील काळेभोर; दिसतील दाट- शायनी

कांद्याच्या रसात फक्त 'या' २ गोष्टी मिसळा, केस होतील काळेभोर; दिसतील दाट- शायनी

वयानुसार केस पांढरे (Grey Hairs) होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल लहान वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येने अनेक जण त्रस्त आहे. केस वयाआधी पांढरे झाल्यावर टेन्शन येतं (Hair Care Tips). आपण आपल्या वयानुसार जास्त मोठे दिसू लागतो. पांढरे केस काळे करण्यासाठी आपण हेअर डाय, किंवा मेहेंदीचा वापर करतो (Hair fall Problem). पण त्यात हानिकारक केमिकल रसायन असतात. ज्यामुळे केस काळे तर होतात, पण निर्जीव आणि कोरडे दिसू लागतात. बऱ्याचदा हेअर डायमुळे केस गळून टक्कही पडतं.

केस काळे (Black Hairs) करण्यासाठी जर आपल्याला रासायनिक उत्पादनांचा वापर करायचा नसेल तर, कांद्याच्या रसाचा वापर करून पाहा. हा एक घरगुती उपाय आहे. यामुळे पांढरे केस काळे होतील आणि केसांना नवीन चमकही मिळेल.शिवाय केसांना पोषणही मिळेल. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारून, केस लांब आणि दाट होतील(ONION JUICE FOR EXTREME HAIR GROWTH! and Grey Hairs).

पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर

- पांढरे होणारे केस काळे करण्यासाठी आपण कांद्याचा रसाचा वापर करू शकता. यासाठी कांद्याचा रस, कडीपत्ता आणि खोबरेल तेलाची आवश्यकता आहे.

जेवणानंतर 'ही' चूक केली तर पश्चाताप अटळ, वजन वाढते झरझर! ५ मिनिटं ‘एवढं’ करा..

- कांद्याच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे केसांना पांढरे होण्यापासून रोखतात. त्यात सल्फर असते, ज्यामुळे केस गळत नाही. आणि केसांच्या वाढीस मदत होते.

- त्याच वेळी खोबरेल तेल केस लांब आणि जाड करण्यासाठी तसेच ते काळे करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

- कडीपत्त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे कोंडा दूर होतो तसेच केस पांढऱ्या होण्याची समस्या दूर होते.

लागणारं साहित्य

४ चमचे कांद्याचा रस

४ चमचे खोबरेल तेल

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

१ चमचा कडीपत्त्याचा रस

या पद्धतीने तयार करा हेअर मास्क

- एका भांड्यात कांद्याचा रस घ्या. त्यात खोबरेल तेल समान प्रमाणात मिसळा. आता त्यात कढीपत्त्याचा रस घालून मिक्स करा. आता हे मिश्रण स्काल्प्वर लावा. १० मिनिटांसाठी हाताने मसाज करा. २ तासानंतर शाम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून किमान दोनदा हे मिश्रण केसांना लावल्याने केस हळूहळू काळे होऊ लागतात. तसेच केसांची चांगली वाढ होईल.

Web Title: ONION JUICE FOR EXTREME HAIR GROWTH! and Grey Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.