Join us  

केस मुळासकट गळतात? पांढरेही झालेत? कांद्याच्या रसात मिसळा ४ पैकी १ गोष्ट; केस होतील दाट - काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 7:50 PM

Onion Juice for Hair: Can It Stop Hair Loss? : कांद्याचा रसाचा वापर केल्याने केसांना फायदा होतो?

बदलत्या हवामानामुळे आणि शरीरात घडत असलेल्या अनेक बदलांमुळे केस आणि त्वचेवर याचा परिणाम दिसून येतो (Hair loss). अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या उद्भवते (Hair care tips). केस गळणे, केसात कोंडा, केस निर्जीव होणे यामुळे केस आणखीन खराब होतात. अशा परिस्थितीत आपण ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतो. पण रासायनिक केमिकल उत्पादनांमुळे केस अधिक प्रमाणात गळू लागतात.

केसांची समस्या सोडवण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचेही उपयोग करू शकता. केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी सल्फर गरजेचं, आणि कांद्याचे सल्फर कोलेजनच्या उत्पादनास उत्तेजन देऊ शकतात. यासंदर्भात, हेअर एक्स्पर्ट प्रियांका बोरकर सांगतात, 'कांद्यामध्ये अँटी- ऑक्सिडंट्स, एन्झाईम्स, फॉलिक अॅसिड आणि सल्फर आढळतात, ज्यामुळे केस मजबूत राहण्यास मदत होते'(Onion Juice for Hair: Can It Stop Hair Loss?).

कांद्याचा रस आणि खोबरेल तेल

केस मजबूत करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिसळून लावू शकता. खोबरेल तेलामध्ये असलेले पोषक तत्वे, केस गळण्याची समस्या दूर करतात. तसेच कोंड्याचीही समस्या दूर होते.

दिवसभरात फक्त 'एवढी'च पावलं चाला, वजन कमी होणारच- हृदयही राहील निरोगी -दिसाल फिट

कांद्याचा रस आणि दही

कांद्याच्या रसात दही मिसळून आपण केसांना लावू शकता. दह्यामध्ये असलेले पोषक तत्वे कोंड्याची समस्या दूर करतात. यासह स्काल्प इन्फेक्शनही दूर होते.

कांद्याचा रस आणि मध

कांद्याच्या रसात मध मिसळून लावल्याने केस मजबूत होतात. तसेच यामुळे केस चमकदारही होतात. आपण केसांना कांद्याच्या रसात मध मिसळून लावू शकता.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

कांद्याचा रस आणि आवळा

आवळा कांद्याच्या रसात मिसळून लावल्याने केसांना फायदा होतो. हे मिश्रण केस काळे करण्यास मदत करते. यासह केस मुलायमही होतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी