Lokmat Sakhi >Beauty > केस पातळ धाग्यासारखे दिसतात? 'या' रंगाच्या कांद्याच्या रसाचा करा वापर; केस करतील शाईन - होतील दाट

केस पातळ धाग्यासारखे दिसतात? 'या' रंगाच्या कांद्याच्या रसाचा करा वापर; केस करतील शाईन - होतील दाट

Onion Juice for Hair: Can It Stop Hair Loss? Know Benefits : केस वाढीसाठी कांद्याच्या रसाचा वापर नक्की कसा करावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 10:00 AM2024-07-11T10:00:57+5:302024-07-11T10:05:01+5:30

Onion Juice for Hair: Can It Stop Hair Loss? Know Benefits : केस वाढीसाठी कांद्याच्या रसाचा वापर नक्की कसा करावा?

Onion Juice for Hair: Can It Stop Hair Loss? Know Benefits | केस पातळ धाग्यासारखे दिसतात? 'या' रंगाच्या कांद्याच्या रसाचा करा वापर; केस करतील शाईन - होतील दाट

केस पातळ धाग्यासारखे दिसतात? 'या' रंगाच्या कांद्याच्या रसाचा करा वापर; केस करतील शाईन - होतील दाट

केस गळण्याची समस्या अनेकांना सतावते (Hair care Tips). केस गळणे, केसात कोंडा, केस पांढरे होणे, यामुळे केस अधिक खराब आणि निर्जीव दिसतात. पण अनेक ब्यूटीउत्पादनांमध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो. ज्यामुळे केसांच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. केस जर वारंवार गळत असतील तर, कांद्याच्या रसाचा वापर करून पाहा.

कांद्याच्या रसात अँटी-बॅक्टिरियल गुणधर्म असतात. जे स्काल्पच्या संसर्गापासून सुटका करते. शिवाय त्यात अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. पण केसांवर कांद्याच्या रसाचा वापर नक्की कशा पद्धतीने करावा?(Onion Juice for Hair: Can It Stop Hair Loss? Know Benefits).

कांद्याच्या रसाचा केसांवर वापर कसा करावा?

टाईम्स ऑफ इंडिया या वेबसाईटनुसार, कांद्याच्या वापराने केसांना मजबुती मिळते. यासाठी २ ते ३ मोठे कांदे घ्या. याच्या रसाने केसांच्या अनेक समस्या सुटतील.

केसांसाठी कांद्याचा रस कसा तयार करायचा?

सर्वात आधी लाल कांदा घ्या. आपण पांढरा कांदा देखील घेऊ शकता. कांद्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घ्या, व त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्टमधून रस काढण्यासाठी एका कपवर गाळणी ठेवा, त्यात पेस्ट ओतून रस गाळून घ्या.

केस फार गळतात, स्काल्पवर बुरशी-फंगल इन्फेक्शन तर नाही? ४ घरगुती उपाय- त्रास कमी

कांद्याचा रस कसा साठवून ठेवायचा?

कांद्याचा रस साठवण्यासाठी एक स्वच्छ कंटेनर घ्या. त्यात हा रस काढून पॅक करा. फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवल्यास ३ दिवस रस आरामात टिकते. आपण बर्फाच्या ट्रेमध्ये रस काढून क्यूब तयार करू शकता. कांद्याच्या रसाचे क्युब्स आपण झिप-लॉक बॅग किंवा कंटेनरमध्ये स्टोर करून ठेऊ शकता.

केसांना कांद्याचा रस लावण्याची योग्य पद्धत

- केसांना कांद्याचा रस लावण्यासाठी आधी केस शाम्पूने धुवून घ्या. केस पूर्णपणे कोरडे करा. यामुळे कांद्याचा रस स्काल्पमध्ये चांगले शोषले जाईल. आता एका बाऊलमध्ये कांद्याचा रस घ्या. त्यात कापसाचा बॉल बुडवा, व स्काल्पवर रस लावा.

ब्यूटी पार्लरला जाऊन महागडे पेडीक्युअर कशाला करता? लिंबाच्या रसाचा करा 'असा' वापर; पाय चमकतील..

- ५ ते १० मिनिटांसाठी स्काल्पवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल. ३० मिनिटांसाठी तसेच राहूद्या.

- २० ते ३० मिनिटानंतर शाम्पू आणि कोमट पाण्याने केस धुवून घ्या. यामुळे केसातून कांद्याचा गंध पूर्णपणे निघून जाईल. नंतर केसांना कंडीशनरही लावा. यामुळे केस सिल्की दिसतील.

- आपण कांद्याच्या रसात मध देखील मिक्स करू शकता. शिवाय खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. आपण या कांद्याचा रसाचा वापर आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.

Web Title: Onion Juice for Hair: Can It Stop Hair Loss? Know Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.