आजकाल बहुतांश लोक केसांच्या अनेक समस्यांपासून त्रस्त आहेत (Onion for Hairs). केस गळती, केसात कोंडा, केस पांढरे होणे, यासह केस पातळही होतात. यावर उपाय म्हणून आपण ब्यूटी उत्पादनांचा वापर करून पाहतो (Hair Growth). पण केमिकल्स प्रॉडक्ट्सचा अतिवापर केसांसाठी हानिकारक ठरू शकते (Hair Care). यावर उपाय म्हणून आपण नैसर्गिक कांद्याचा वापर करून पाहू शकता.
कांद्याचा वापर फक्त फोडणीसाठी होत नसून, यामुळे केसांच्या अनेक समस्याही सुटतात. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. शिवाय त्यात सल्फर देखील असते. जे कोलेजन उत्पादनास चालना देते. यामुळे त्वचेच्या पेशी निरोगी राहतात, व केसांची वाढ योग्य प्रमाणात होते. पण कांद्याच्या रसाचा वापर केसांसाठी कसा करावा?(Onion juice for hair growth: Does it work and how?).
कांद्याचा रस आणि लिंबू
द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, केस मजबूत ते कोंड्याची समस्या सोडवण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. शिवाय लिंबू देखील केसात कोंडा ते केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त करतील. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा कांद्याचा रस घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. हे दोन्ही घटक चांगले मिसळा आणि केसांना लावा. या रसाचा वापर आठवड्यातून दोनदा करा. काही वेळानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवा.
केस धुतले की फरशीवर केसच केस? शाम्पूमध्ये मिसळा १ नैसर्गिक जेल; केस होतील घनदाट-करतील शाईन
केसांसाठी लिंबाचा वापर
उन्हाळ्यात लिंबाचा वापर अधिक प्रमाणात होतो. यामुळे स्किन आणि केसांनाही फायदा होतो. लिंबाचे अँटीफंगल गुणधर्म आपल्या टाळूला निरोगी ठेवतात. शिवाय लिंबू हे व्हिटॅमिन सी समृध्द असतात. ज्यामुळे स्काल्प क्लिन राहते, व ब्लड सर्क्युलेशन सुधारते.
कांद्याचा रस आणि मेथी
केसांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी आपण कांद्याचा रस आणि मेथीचा वापर करू शकता. यासाठी प्रथम, एका बाऊलमध्ये कांद्याचा रस घ्या, त्यात एक चमचा मेथी पावडर घालून मिक्स करा. तयार पेस्ट केसांवर लावा. १० ते १५ मिनिटानंतर केस सामान्य पाण्याने धुवा. मेथीतील गुणधर्म आणि कांद्यातील पौष्टीक घटक, केसांच्या वाढीस मदत करतील.
कोपर - गुडघ्यांचा काळेपणा वाढतच चालला आहे? दह्यात मिसळा २ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात दिसेल फरक
केसांसाठी मेथी दाण्यांचे फायदे
केसांसाठी मेथी दाणे फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड केसांना आतून पोषण देतात. याशिवाय यामध्ये लेसिथिन देखील आढळते, जे केसांना मजबूत करते. ज्यामुळे केस गळती थांबते.