Join us  

महिन्यातून दोनदा केस कापावे लागतील इतके वाढतील केस; फक्त 'या' तेलात कांद्याचा रस मिसळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 4:56 PM

Onion juice for hair growth: Does it work and how? Hair Growth Oil : घरातच तयार करा जादुई तेल; केस वाढतील भरभर - दिसतील दाट, काळेभोर

केस गळतीमागे अनेक कारणं असू शकतात (Hair Growth Oil). आजकाल प्रत्येक जण केस गळतीमुळे त्रस्त आहे. केस धुताना, केस विंचरताना, हेअर स्टाईल करताना केस हमखास गळतात (Hair Care Tips). केसांची गळती वाढल्यानंतर टक्कल पडेल की काय असा प्रश्न मनात येतो (HairFall Problems). केस गळती सुरु झाल्यानंतर केसांची योग्य वाढ होत नाही. केसांची वाढ खुंटते.

जर आपले केस अतिप्रमाणात गळत असतील तर, केमिअल रसायनयुक्त उत्पादनांचा वापर न करता, घरगुती तेल तयार करा. या तेलामुळे केस गळणे थांबेल. शिवाय केसांची वाढ इतकी होईल की, महिन्यातून २ वेळा आपल्याला केस कापावे लागतील. या घरगुती तेलात कोणत्या साहित्यांचा वापर होतो? यामुळे केसांची वाढ होते का? पाहूयात(Onion juice for hair growth: Does it work and how? Hair Growth Oil).

हेअर ग्रोथसाठी घरगुती तेल

- १०० ग्राम कांदा

केस गळतीमुळे हैराण? खोबरेल तेलात मिसळा '१' खास पावडर; केस होतील घनदाट

- तिळाचे तेल

- मेथी दाणे

- कलौंजी

'या' पद्धतीने हेअर ग्रोथ तेल तयार करा

सर्व प्रथम, 100 ग्रॅम कांदा किसून घ्या.

यानंतर गॅसवर तवा ठेवा आणि त्यात तीळाचे तेल घाला.

आता तेलात किसलेला कांदा, मेथी दाणे आणि कलौंजी घालून मिक्स करा.

१० मिनिटानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर गाळून एका डब्यात ठेवा.

गुडघ्यापर्यंत दाट केस हवेत? कांद्याच्या तेलाचा 'असा' करा वापर; काळेभोर केसांचं सिक्रेट

हे तेल दर दोन दिवसांनी केसांना लावा. एका महिन्यात केसांची वाढ होईल.

केसांसाठी तिळाच्या तेलाचे फायदे

केसांसाठी तिळाचे तेल अत्यंत फायदेशीर ठरते. याच्या नियमित वापराने केस गळणे, केसात कोंडा, केस पांढरे होणे यासह अनेक केसांच्या निगडीत समस्या सुटतील. यामध्ये ओमेगा ३, ओमेगा ६ आणि ओमेगा ९ सारखे फॅटी ॲसिड आढळतात. जे केसांमध्ये आर्द्रता निर्माण करण्याचे काम करतात, ज्यामुळे केस निरोगी आणि चमकदार दिसतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स