Join us  

केस गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा वापरुन हेअर टॉनिक केसांना लावा; भराभर वाढतील केस 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 4:10 PM

Onion Oil for Hair Growth : कांद्याच्या केसांच्या मास्कने केस दाट होऊ शकतात. हा हेअर मास्क बनवण्यासाठी कांद्याच्या रसात लिंबाचा रस आणि आवळा पावडर घाला.

कंगवा फिरवताच केस तुटून हातात येतात हे खूपच कॉमन झालंय. केस गळणं कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तेले, शॅम्पू उपलब्ध आहेत पण प्रत्येकवेळी या उपायांचा उपयोग होतोच असं नाही. पण काही सोपे घरगुती उपाय कोणत्याही केमिकल्सशिवाय तुम्हाला लांबसडक केस देऊ शकतात. (Hair Care Tips)

आपल्या प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात कांदा असतोच. कांद्याशिवाय भाज्यांना चव येत नाही. कांदे केसांसाठीही खूप फायदेशीर ठरतात. केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरण्यापेक्षा केसांवर कांदा लावला तर कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय केसांची वाढ होण्यास मदत होईल. (Hair oil for hair growth) 

केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा शॅम्पू आणि कंडिशनरने स्वच्छ धुण्याची सवय ठेवा. यामुळे केसांना नैसर्गिक चमक येईल. जर कंडिशनरनं केस गळत असतील तर मेथीच्या पाण्याचं नैसर्गिक कंडिशनर वापरा.  केसांवर  स्ट्रेनरसारख्या हिटींग टुल्सचा वापर करू नका. (How to make hair growth oil for long hairs)

-

-सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात  एक कांदा चिरून घाला. त्यात १/४ कप कोणतंही घरात उपलब्ध असलेलं तेल (नारळाचं किंवा बदामाचं) घाला. मिक्सरमध्ये फिरवून हे मिश्रण  गाळून घ्या. गाळलेलं मिश्रण एका कापसाच्या साहाय्यानं केसांना लावा. एक आठवडा रोज हा प्रयोग केल्यास केसांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. केस  चमकदार दाटही दिसतील. 

डार्क सर्कल्स कमीच होत नाहीत? फक्त १ बटाटा किसून करा सोपा उपाय, चेहऱ्यावर येईल चमक

- कांद्याच्या केसांच्या मास्कने केस दाट होऊ शकतात. हा हेअर मास्क बनवण्यासाठी कांद्याच्या रसात लिंबाचा रस आणि आवळा पावडर घाला. यानंतर ते चांगले मिसळा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि सुमारे 30 मिनिटे राहू द्या. साधारण ३० मिनिटांनी केस सामान्य पाण्याने धुवा.

केस खूप पिकलेत, डाय नको वाटतो?  या ट्रिकनं घरगुती डाय लावा; कायम केस राहतील काळेभोर

- पातळ केस जाड करण्यासाठी कांद्याचे छोटे तुकडे करून खोबरेल तेलात टाका. आता हे तेल चांगले उकळून मंद आचेवर रंग बदलेपर्यंत शिजवा. यानंतर हे तेल थंड होऊ द्या. आता हे तेल केसांना लावून मसाज करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी