Lokmat Sakhi >Beauty > न्यू इअर पार्टीमध्ये चमकायचंय? कांद्याच्या रसात चमचाभर मिसळा ‘ही’ गोष्ट, चेहरा चमकेल

न्यू इअर पार्टीमध्ये चमकायचंय? कांद्याच्या रसात चमचाभर मिसळा ‘ही’ गोष्ट, चेहरा चमकेल

Onion on Skin: Potential Benefits and How to Use : कांद्याचा रस फक्त केसांसाठी नसून चेहऱ्यासाठीही ठरते फायदेशीर, पाहा याचा वापर आणि फायदे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2023 11:54 AM2023-11-25T11:54:21+5:302023-11-25T11:55:03+5:30

Onion on Skin: Potential Benefits and How to Use : कांद्याचा रस फक्त केसांसाठी नसून चेहऱ्यासाठीही ठरते फायदेशीर, पाहा याचा वापर आणि फायदे..

Onion on Skin: Potential Benefits and How to Use | न्यू इअर पार्टीमध्ये चमकायचंय? कांद्याच्या रसात चमचाभर मिसळा ‘ही’ गोष्ट, चेहरा चमकेल

न्यू इअर पार्टीमध्ये चमकायचंय? कांद्याच्या रसात चमचाभर मिसळा ‘ही’ गोष्ट, चेहरा चमकेल

बरेच जण कांद्याचा (Onion juice for Skin) वापर फक्त फोडणीसाठी करतात. शिवाय याचा वापर केसांच्या वाढीसाठीही होतो. पण कांद्याच्या रसाचा वापर आपण कधी चेहऱ्यासाठी करून पाहिलं आहे का? कांदा हा अनेक पौष्टीक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे शरीरातील बऱ्याच अवयांना फायदा होतो. पण कांद्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने, स्किनला कोणता फायदा होतो? कांद्याचा रस आणि मध एकत्र करून लावल्याने स्किनच्या अनेक समस्या सुटतात.

कांद्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, अँटी-ऑक्सिडेंट्ससारखे गुणधर्म असतात. ज्यामुळे स्किनवर नैसर्गिक ग्लो (Natural Glow) येतो, शिवाय स्किन डागरहित होते. तर मधामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेसाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे चेहऱ्यावर कांद्याचा रस आणि मध लावल्याने कोणते फायदे मिळतात? पाहूयात(Onion on Skin: Potential Benefits and How to Use).

चेहऱ्यावर कांद्याचा रस आणि मध लावण्याचे फायदे

मुरुमांच्या समस्येवर फायदेशीर

अनेकदा पिंपल्स आल्यानंतर चेहऱ्यावर काळपट डाग पडतात. हे डाग काढण्यासाठी आपण कांद्याचा रस आणि मधाचा वापर करू शकता. कांद्याच्या रसामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे थेट डागांवर काम करतात. यासाठी एका वाटीत समप्रमाणात कांद्याचा रस आणि मध घेऊन मिक्स करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. याचा वापर आठवड्यातून २ वेळा केल्याने चेहरा डागरहित होईल.

थंडी सुरु झाली-त्वचा कोरडी पडलीय? मुरुमांच्या डागांनी त्रस्त? हळदीत २ गोष्टी मिसळून बनवा फेसपॅक - चेहरा चमकेल

चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

त्वचेची चमक वाढवण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. कांद्याचा रस आणि मध चेहऱ्यावरील धूळ, घाण साफ करते. यासाठी एका वाटीत कांद्याचा रस आणि मध समप्रमाणात घ्या, नंतर त्यात एक चमचा बेसन घालून मिक्स करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा.

चेहरा उजळ पण मान काळवंडली? खोबरेल तेलाचे २ सोपे उपाय, करून तर पाहा-काही दिवसात उजळेल मान

सुरकुत्या होईल कमी

वय झाल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होतातच. शिवाय स्किन सैल पडते. जर कमी वयात सुरकुत्या दिसत असेल तर, आपण कांद्याचा रस आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत कांद्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन मिक्स करा. नंतर चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. यामुळे सैल झालेली स्किन टाईट होईल. शिवाय सुरकुत्याही कमी होतील.

Web Title: Onion on Skin: Potential Benefits and How to Use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.