Lokmat Sakhi >Beauty > केस बरेच पिकलेत, पण डाय करायचा नाहीये? कांद्याच्या सालीचा डाय बनवा, केस होतील काळेभोर

केस बरेच पिकलेत, पण डाय करायचा नाहीये? कांद्याच्या सालीचा डाय बनवा, केस होतील काळेभोर

Onion Peel For Healthy Hair Growth : या उपायाचा एक फायदा असा की डाय लावल्यानंतर कपड्यांवर किंवा हातांना डाग लागतात तसे घट्ट डाग पडणार नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 10:18 PM2023-04-16T22:18:30+5:302023-04-16T22:23:54+5:30

Onion Peel For Healthy Hair Growth : या उपायाचा एक फायदा असा की डाय लावल्यानंतर कपड्यांवर किंवा हातांना डाग लागतात तसे घट्ट डाग पडणार नाहीत.

Onion Peel For Healthy Hair Growth : Homemade onion peel hair dye for naturally black hairs | केस बरेच पिकलेत, पण डाय करायचा नाहीये? कांद्याच्या सालीचा डाय बनवा, केस होतील काळेभोर

केस बरेच पिकलेत, पण डाय करायचा नाहीये? कांद्याच्या सालीचा डाय बनवा, केस होतील काळेभोर

आजकाल प्रत्येक वयोगटातील लोकांचे केस पांढरे झालेले दिसून येतात. लहान वयात केस पांढरे झाल्यास केमिकल्सयुक्त हेअर कलर, डाय वापरण्याची भिती वाटणं साहाजिक आहे. (Does onion peel promote hair growth) आपले केस कायमचे खराब होतील का, केसांच्या वाढीवर काही परिणाम होईल का, एकदा डाय लावल्यानंतर सतत लावावा लागेल का असे अनेक प्रश्न मनात येतात. (Onion peel hair dye)

अशी समस्या तुम्हालाही उद्भवत असल्यास काही घरगुती उपाय तुम्हाला दिलासा देऊ शकतात. कारण याचे कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवत नाहीत. प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात कांदे असतात. कांद्याच्या साली वापरानंतर फेकून दिल्या जातात. पण याच कांद्याच्या सालीचा वापर करून तुम्ही पांढरे केस काळे करू शकता. पार्लरचा कोणताही खर्च न करता. (How do you use onion peel water for hair growth)

घरगुती डाय बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईत  कांद्याची सालं भाजून घ्या.  कांद्याची सालं लालसर झाल्यानंतर त्यात मेथीचे दाणे आणि ४ बदाम घाला.  हे मिश्रण मिक्सरमधून काढून बारीक करून घ्या. त्यात एक कॅप्सूल आणि नारळाचं तेल घाला.  पातळ पेस्ट तयार झाल्यानतंर  ब्रशच्या साहाय्यानं ही पेस्ट केसांना लावा. 

या उपायाचा एक फायदा असा की डाय लावल्यानंतर कपड्यांवर किंवा हातांना डाग लागतात तसे घट्ट डाग पडणार नाहीत. ही पेस्ट केसांना लावल्यानंतर हलक्या हातानं मसाज करा.  २ तास केस असेच बांधून ठेवा नंतर शॅम्पू आणि कंडीशनरनं  केस स्वच्छ धुवा. महिनाभरात २ ते ३ तीनवेळा हा उपाय केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. 

Web Title: Onion Peel For Healthy Hair Growth : Homemade onion peel hair dye for naturally black hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.