Join us  

केसांना तेल लावायलाच आवडत नाही? मग हेल्दी-सुंदर केसांसाठी करा फक्त 5 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 2:45 PM

तेल न लावल्यानं केसांचं नुकसान अटळ आहे. तेलाशिवाय केसात आद्र्रता कशी निर्माण होईल? केस मॉश्चराइज्ड असणंही केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणूनच केसांना तेल लावणं सोडण्याआधी तेलाऐवजी केसांना काय लावलं जायला हवं याची माहिती असणं गरजेचं आहे.

ठळक मुद्देकेसांना मध लावावं. मधामुळे केसांचं मॉश्चरायझिंग होतं.केसांच्या मुळांना मजबूत करण्यासोबतच दह्यामुळे केसांचं नुकसान होत नाही.केळाच्या मास्कमुळे केसांच्या मुळांशी कोरडेपणा येणं, खाज येणं, केसात कोंडा होणं या समस्या सुटतात.

 केसांचं नीट पोषण होण्यासाठी, केसांना चमक येण्यासाठी, केस वाढण्यासाठी, मजबूत होण्यासाठी केसांना तेल लावण्याशिवाय पर्याय नाही. तेलानं केसांना फायदा होतो हे माहीत असूनही अनेकांना केसांना तेल लावायला आवडत नाही. का तर, केस चिपकूचिपकू दिसतात, केसांना लावलेलं तेल बाहेर उन्हात चेहर्‍यावर ओघळून चेहरा तेलकट चिकट होतो. तसेच केस तेलकट असतील तर डोक्यात कोंडा होतो, डोकं जड पडतं, आळस येतो, केसांची मुळं तेलाअभावी कोरडी पडली तरीसुध्दा केस लवकर खराब होतात. हे सर्व टाळावं म्हणून अनेकजणी केसांना तेल लावायचंही सोडून देतात. पण त्याचा परिणाम उलटाच होतो. केस रुक्ष होतात, केसांवर वाईट परिणाम होवून केस गळायला लागतात. केसांच्या मुळांशी कोरडेपणा येतो, केसांना पोषण न मिळाल्यानं केस लांबीला आणि जाडीला वाढत नाही.

 Image: Google

तेल न लावल्यानं केसांचं नुकसान अटळ आहे. तेलाशिवाय केसात आद्रता कशी निर्माण होईल? केस मॉश्चराइज्ड असणंही केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणूनच केसांना तेल लावणं सोडण्याआधी तेलाऐवजी केसांना काय लावलं जायला हवं याची माहिती असणं गरजेचं आहे.तेल न लावताही केस सुरक्षित आणि समस्याविरहित राहू शकतात, तेल न लावतही केसांना सौंदर्य आणि अपेक्षित लांबी जाडी येते असं तज्ज्ञ म्हणतात. यासाठी स्वयंपकघरातले मध, दही, अव्हाकॅडो, केळाचं मास्क या गोष्टींचा वापर करता येतो. तो वापर कसा करायचा हे समजून घेणं गरजेचं आहे.

केसांना तेल लावायला पर्याय काय?

Image: Google

1. मध: सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात की केसांना तेल लावायला आवडत नाही, हे एकवेळ समजून घेता येतं. पण म्हणून केसांना काहीच न लावणं हे मात्र चुकीचं आहे. ही चूक केसांना मध लावून सुधारता येते. मधामुळे केसांचं मॉश्चरायझिंग होतं. केसांना चमक येते. केस मऊ मुलायम आणि चमकदार करण्यासाठी केसांना मध लावणं हा उत्तम उपाय आहे.केसांना शाम्पू लावून धुण्यआधी एका वाटीत केसांच्या लांबी जाडीनुसार मध घ्यावं. जेवढं मध तेवढं पाणी त्यात घालावं. ते चांगलं मिसळून घ्यावं. हे मिर्शण मग केसांच्या मुळांशी आणि केसांना व्यवस्थित लावावं. 20 मिनिटानंतर केस सौम्य शाम्पूचा वापर करत धुवावेत. या उपायाचा चांगला परिणाम केसांवर लवकर दिसून येतो.

Image: Google

2. दही: हे देखील केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. केसांच्या मुळांना मजबूत करण्यासोबतच दह्यामुळे केसांचं नुकसान होत नाही. केसांमधे आद्र्रता अर्थात मॉश्चरायझर टिकून राहातं. केसांना दही लावल्याने केस लांब होतात आणि गळत-झडत नाही. जर केस कोरडे/ रुक्ष वाटत असतील तर दही केसांना डायसारखं लावावं. केसांना दही लावून 20 मिनिटं ते केसांवर तसेच राहू द्यावे. वीस मिनिटानंतर केसांना शाम्पू लावत केस धुवावेत. दह्याच्या या पॅकचा उपयोग केसांना मॉश्चराइज करुन केसांना योग्य पोषण देण्यासाठी होतो. तसेच दह्यामुळे केस गळत नाहीत.

Image: Google

3. अंडं: अंड्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यानं अंडं हे केसांसाठी सुपरफूड मानलं जातं. अंड्यात जीवनसत्त्वं, फोलेट, बायोटिन हे घटक केसांना हेल्दी बनवतात.तसेच केसांच्या मुळांचं, टाळूचं खोलवर पोषण करण्यची क्षमता अंड्यामधे असते. अंडयामधे केस गळतीही थांबते.

Image: Google

4. अव्हाकॅडो: बायोटीन आणि जीवनसत्त्वयुक्त अव्हाकॅडो हे फळ मेक्सिको आणि पूएब्ला या शहरात मिळतं. गोड-आंबट चवीच्या फळात केसांना उपयुक्त फॅटी अँसिड असतं. आठवड्यातून एकदा अव्हाकॅडो आठवड्यातुन एकदा तरी केसांना लावावं. ते लावताना आधी हे फळ स्मॅश करुन घ्यावं आणि मग केसांना लावावं. अध्र्या तासानंतर केस धुवावेत.

Image: Google

5. केळाचं मास्क: केळामधे सिलिका आणि जीवाणूविरोधी घटक असतात. यामुळे केसांच्या मुळांशी कोरडेपणा येणं, खाज येणं, केसात कोंडा होणं या समस्या सुटतात. केळाचं मास्क लावल्यानं केस मुलायम होतात आणि केस तुटतही नाहीत.