हिवाळ्याच्या दिवसांत ताजी संत्री दिसायला सुरूवातु होते. संत्री खाल्ल्यानंतर अनेकजण साली फेकून देतात. साली फेकून न देता याचा वापर करून तुम्ही त्वचेवर ग्लो आणू शकता. (Amazing Benefits Of Using Orange Peel Powder) थंडीच्या दिवसांत कधी चेहरा काळा पडतो तर कधी स्किन जास्त कोरडी पडते. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही स्किन केअर उत्पादनांचा वापर करत असाल तर केमिकल्सपेक्षा संत्र्याच्या सालीचा वापर उत्तम ठरेल. (Orange Peel Benefits For Skin)
सगळ्यात आधी संत्र्याची साल कढईत भाजून घ्या. ४ ते ५ मिनिटं भाजल्यानंतर या साली मिक्सरच्या भांड्यात घाला. बारीक पेस्ट झाल्यानंतर भांड्यातून खाली काढून घ्या. त्यात बेसन पीठ, हळद आणि पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट एकजीव करून चेहऱ्याला किंवा हाता-पायांना लावा. १० मिनिटांनी लावलेला हा पॅक सुकल्यानंतर हात व्यवस्थित धुवून घ्या. (Orange peel benefits for skin whitening)
संत्र्याची साल चेहऱ्याला लावण्याचे फायदे (Skin Benefits of Orange Peel)
१) संत्र्याच्या सालीत आणि संत्र्यच्या रसात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. हे एक शक्तिशाली एंटी ऑक्सिडेंट आहे. याशिवाय संत्री त्वचेत कोलोजन प्रोटीन वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत.
केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस
२) चेहऱ्यावर काळेपणा, टॅनिंग, पिग्मेंटेनश आणि डाग यांसारख्या समस्यांवरही संत्र्याची सालं प्रभावी ठरते. यामुळे त्वचेच्या रंगात बदल दिसतो. नॅच्यरल ग्लो येण्यासही मदत होते. कोरडी त्वचा असलेल्यांनी नियमित चेहऱ्यावर संत्र्याचा रस लावला तर त्वचेत मॉईश्चर टिकून राहते आणि स्किन सॉफ्ट होते.
३) त्वचेतील सूज कमी होते. नियमित हा रस चेहऱ्याला लावल्याने पिंपल्स, दाणे, अन्य एलर्जी पासून बचाव होतो. यामुळे रोमछिद्र उघडली जातात आणि स्किन प्रोब्लेम्सपासून बचाव होतो.
संत्र्याचा रस चेहऱ्याला कसा लावावा?
तुम्ही क्लिंजरच्या स्वरूपात संत्र्याचा फेस क्लिंजरचा वापर करू शकता. यासाठी यासाठी १ ते २ चमचे संत्र्याच्या रसात बेसिन पीठ, हळद, कॉफी किंवा बेसन मिसळून संत्र्याच्या रसाबरोबर अप्लाय करा. त्यानंतर त्वचेवर फरक दिसून येईल.