Lokmat Sakhi >Beauty > पार्लर सारखा इन्स्टंट ग्लो देईल संत्र्याची साल, संत्री खा पण साली फेकू नका कारण...

पार्लर सारखा इन्स्टंट ग्लो देईल संत्र्याची साल, संत्री खा पण साली फेकू नका कारण...

Orange Peel Mask For Skin Brightening : संत्री खाऊन साली फेकू नका, संत्र्यांच्या सालींचा सौंदर्योपचारात मोठा उपयोग आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 06:33 PM2023-01-31T18:33:39+5:302023-01-31T18:44:36+5:30

Orange Peel Mask For Skin Brightening : संत्री खाऊन साली फेकू नका, संत्र्यांच्या सालींचा सौंदर्योपचारात मोठा उपयोग आहे.

Orange peel will give you an instant glow like a parlor, eat oranges but don't throw away the peel because.... | पार्लर सारखा इन्स्टंट ग्लो देईल संत्र्याची साल, संत्री खा पण साली फेकू नका कारण...

पार्लर सारखा इन्स्टंट ग्लो देईल संत्र्याची साल, संत्री खा पण साली फेकू नका कारण...

आपण फळे खाल्ल्यानंतर सहसा त्याची साल फेकून देतो. परंतु फळ जितके पौष्टिक असतात तितकेच फळांच्या सालीत बहुगुणी औषधी गुणधर्म असतात. या फळांच्या सालीचा वापर करून आपण घरच्या घरी छान फेसपॅक तयार करू शकतो. हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. याच्यापुढे महागडे फेशियल आणि ब्रँडेड क्रिमही अपयशी ठरू शकतात. त्यातील पोषक घटक आपली त्वचा निरोगी बनवते आणि चेहर्‍यावर नैसर्गिक चमक देखील येते. चमकदार त्वचेसाठी संत्र्यांच्या सालींपासून नैसर्गिक फेसपॅक तयार करून लावल्यास आपल्याला अधिक फरक जाणवेल. संत्र्याची साल सुंदर त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि आपल्या डेलीच्या स्किनकेअर रुटीनमध्ये संत्र्यांच्या सालींचा फेसपॅक कश्या पद्धतीने समाविष्ट करु शकता याबद्दल माहिती करून घेऊया. 

संत्र्याच्या सालीची पावडर एक किफायतशीर उत्तम सौंदर्य प्रसाधन आहे. ही पावडर सहज घरी सहज बनवता येते. संत्र्याची सालं उन्हात वाळवा आणि पूर्ण वाळल्यावर त्याची पावडर करा. या पावडरचा अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही संत्र्याची साल टाकून देण्याचा विचार करण्यापूर्वी संत्र्याच्या साली वापरुन तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आणि नैसर्गिक फेसपॅक बनवू शकता. यामुळे तुम्हांला ग्लोइंग, नितळ, सुंदर त्वचा मिळण्यास मदत होईल(Orange peel is beneficial for the skin).

साहित्य :- 

१. संत्र्याच्या साली - २ ते ३ संत्र्याच्या साली 
२. चंदनाची पावडर - १ टेबलस्पून 
३. कोरफडीचा गर / कोरफड जेल -  १ टेबलस्पून 

कृती :- 

१. संत्र्याच्या साली २ ते ३ दिवस उन्हांत वाळवून घ्याव्यात. या साली संपूर्ण वाळून त्यातील पाण्याचा अंश निघून जाईल याची खात्री करून घ्यावी. 
२. त्यानंतर या साली मिक्सरला लावून त्याची बारीक पूड करून घ्यावी. 
३. ही संत्र्याची पावडर १ टेबलस्पून घेऊन त्यात १ टेबलस्पून चंदनाची पावडर आणि कोरफडीचा गर किंवा जेल घालून ते मिश्रण एकजीव करून घ्या. 
४. आपला संत्र्यांच्या सालीचा फेसपॅक बनून तयार आहे. 
५. हा फेसपॅक चेहऱ्याला लावून १० मिनिटे तसाच ठेवा. किंवा फेसपॅक संपूर्ण सुकेपर्यंत चेहऱ्यावर तसाच ठेवून घ्या. 
६. १० मिनिटांनंतर हलक्या गरम पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. 
७. चेहरा स्वच्छ सुती कापडाने पुसून कोरडा करून घ्यावा. 

 

संत्र्याच्या सालीच्या पावडरचे उपयोग :- 

१. मुरुम व मुरुमांचे चट्टे साफ करते - संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणांत असते. संत्र्याच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असल्याने ते मुरुम तयार करणाऱ्या बॅक्टेरियावरही गुणकारी ठरते ज्यामुळे आपल्याला निरोगी त्वचा मिळते.

२. नैसर्गिक ब्लीच म्हणून कार्य करते - बहुतेक व्हिटॅमिन 'सी' फळांमध्ये नैसर्गिकरीत्या ब्लिचिंग गुणधर्म असतात. जे काळे डाग आणि रंगद्रव्य हलके करण्यास मदत करतात. संत्र्याच्या सालीची पावडर हा या पदार्थाचा उत्तम स्रोत आहे. पावडरमधील व्हिटॅमिन 'सी' त्वचेचा नैसर्गिक रंग उजळण्यात मदत करते. 

३. ग्रेट नॅचरल एक्सफोलिएटर - संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये आपल्या त्वचेला तरुणपणा देण्यासाठी नैसर्गिक खनिजे असतात. त्वचेच्या पृष्ठभागावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी संत्र्याची साल उपयुक्त ठरते. कारण संत्र्याच्या सालीची पावडर नवीन पेशींच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन देते.  

४. त्वचेसाठी नैसर्गिक ग्लोइंग - संत्र्याची साले व्हिटॅमिन 'सी' चा एक उत्कृष्ट स्रोत आहे. यामुळे नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा देण्यास मदत करते. फेसपॅकमध्ये संत्र्याच्या सालीची पावडर टाकल्याने तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू शकते.

Web Title: Orange peel will give you an instant glow like a parlor, eat oranges but don't throw away the peel because....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.