Lokmat Sakhi >Beauty > अंकिता लोखंडेची ८० हजारांची ऑर्गेंजा सिल्क साडी; सिल्कचा हा महागडा प्रकार नक्की असतो काय?

अंकिता लोखंडेची ८० हजारांची ऑर्गेंजा सिल्क साडी; सिल्कचा हा महागडा प्रकार नक्की असतो काय?

Actress Ankita Lokhande: अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिचा ३७ वा वाढदिवस (37th birth day of Ankita Lokhande) नुकताच दणक्यात साजरा केला. यावेळी तिने ऑर्गेंजा सिल्क (Organza silk Saree) या अतिशय महागड्या प्रकारात मोडणारी साडी नेसली होती.... या साडीची खासियत पाहिली, तर नक्कीच साडीची किंमत एवढी जास्त का ते लक्षात येईल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 12:42 PM2021-12-22T12:42:54+5:302021-12-22T12:44:27+5:30

Actress Ankita Lokhande: अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिचा ३७ वा वाढदिवस (37th birth day of Ankita Lokhande) नुकताच दणक्यात साजरा केला. यावेळी तिने ऑर्गेंजा सिल्क (Organza silk Saree) या अतिशय महागड्या प्रकारात मोडणारी साडी नेसली होती.... या साडीची खासियत पाहिली, तर नक्कीच साडीची किंमत एवढी जास्त का ते लक्षात येईल...

Organza silk Saree of actress Ankita Lokhande worth Rs. 80,000. Birthday look of actress is viral | अंकिता लोखंडेची ८० हजारांची ऑर्गेंजा सिल्क साडी; सिल्कचा हा महागडा प्रकार नक्की असतो काय?

अंकिता लोखंडेची ८० हजारांची ऑर्गेंजा सिल्क साडी; सिल्कचा हा महागडा प्रकार नक्की असतो काय?

Highlightsपार्टी वेअर कपडे किंवा ब्रायडल कपड्यांसाठी खास करून ऑर्गेंजा सिल्क वापरण्यात येते.फ्लोरल प्रिंट, बुटी प्रिंट याप्रमाणेच आता जॅकर्ड पॅटर्नही ऑर्गेंजा सिल्कमध्ये दिसत आहे. 

अंकिताचं नुकतंच लग्न झालं आणि त्यानंतर अवघ्या दोन- तीन दिवसांतच तिचा वाढदिवस आला. त्यामुळे यावर्षी अंकिताचा वाढदिवस खूपच स्पेशल ठरला. नवरा विकी जैन (Ankita Lokhande's husband Vicky Jain), सासरची मंडळी आणि मोजक्या काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत अंकिताने वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केले असून या फोटोंमध्ये दिसून येणाऱ्या अंकिताच्या साडीने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. अंकिताची ही साडी ऑर्गेंजा सिल्क (what is the speciality of Organza silk Saree) या प्रकारातली असून साडीची किंमत तब्बल ८० हजार रूपये (Rs. 80,000) एवढी आहे. 

 

अंकिताने तिचे जे फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत, त्याला तिने A saree is the perfect way of proudly flaunting who I am without having to say it.... असं कॅप्शन दिलं आहे.. या कॅप्शननुसार अंकिता खरोखरंच या साडीत अतिशय सुंदर दिसत असून नव्या नवरीचं हे रूप तिच्या चाहत्यांना भलतंच आवडलं आहे. अंकिताची ही साडी JJ Valaya organza silk या ब्रॅण्डची आहे. साडीचा बेस कलर पेस्टल ब्लू असून सोनेरी, हिरवा, गुलाबी, निळा असे अनेक रंग या साडीवर आहेत. नाजूक पाना- फुलांची डिझाईन आणि उभ्या- आडव्या रेषा असलेली ही साडी खूपच मोहक आहे. तसेच या साडीवर गोल्डन थ्रेडने एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. अंकिताने या साडीवर स्ट्रेपी पॅटर्नचे हिरव्या रंगाचे ब्लाऊज घातले आहे. 

 

कसे असते ऑर्गेंजा सिल्क?
What is Organza silk?

नायलॉन आणि पॉलिस्टर धाग्यांचा वापर करून ऑर्गेंजा सिल्क बनविण्यात येते. हे कापड खूपच मऊ, मुलायम (fabric of Organza silk) आणि वजनाने खूपच (light weight saree) कमी असते ही त्याची खरी खासियत. जेवढे मऊ आणि वजनाला हलके कापड असते, तेवढी त्याची किंमत जास्त असते. पार्टी वेअर कपडे किंवा ब्रायडल कपड्यांसाठी खास करून ऑर्गेंजा सिल्क वापरण्यात येते. ऑर्गेंजा सिल्क साड्यांची तर चांगलीच क्रेझ आहे, पण त्यासोबतच पार्टी गाऊन, लेहेंगा, दुपट्टा, ब्रायडल आऊटफिट्स यामध्येही आता ऑर्गेंजा सिल्कचा वापर केलेला दिसून येतो आणि तो देखील खूपच लोकप्रिय होत आहे. फ्लोरल प्रिंट, बुटी प्रिंट याप्रमाणेच आता जॅकर्ड पॅटर्नही ऑर्गेंजा सिल्कमध्ये दिसत आहे. 

 

ऑर्गेंजा सिल्क बाबत अजून काही....
Something more about Organza silk...

- वेगवेगळे शेड आणि डिझाईन आपल्याला या प्रकारात मिळू शकतात.
- याचं मटेरिअल खूपच मऊ, मुलायम असल्याने ही साडी कोणत्याही ऋतूत वापरणे अतिशय आरामदायी ठरते.
- जरी बॉर्डर असणारी ऑर्गेंजा साडी लग्न- कार्यात खूपच एलिगंट लूक देते.
- या साडीचा फिलच इतका छान असतो की ती साडी नेसणाऱ्याला आणि बघणाऱ्यालाही तिचा रिचनेस लगेच जाणवतो. 
- स्टायलिश लूकसाडी ही साडी नेसली जाते. 
- ही साडी नेसताना त्या सोबत रफल प्रकारात येणारा पेटीकोट घाला. अधिक छान लूक येईल आणि साडी छान बसेल. 

 

Web Title: Organza silk Saree of actress Ankita Lokhande worth Rs. 80,000. Birthday look of actress is viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.