दिवसभर आपण कामानिमित्त घराबाहेर असतो. आपण बहुतेकवेळा उन्हात फिरतो, यामुळेच धूळ, प्रदूषण, माती यांसारख्या अनेक समस्यांचा सामना आपल्या त्वचेला करावा लागतो. दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करुन आपली त्वचा फार थकलेली असते. याचबरोबर आपल्या त्वचेवर धूलिकण, माती यांचा एक प्रकारचा थर साचून राहतो. आपल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये ही धूळ, माती, घाण अडकून बसते. यामुळे त्वचेचा पोत, टेक्श्चर तर खराब होतेच शिवाय स्किन टोन देखील डल होतो. अशा अनेक समस्या झेलून आपली त्वचा थकून जाते. त्वचा खराब होऊन सुकून जाते एवढेच नाही तर त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य हरवून जाते(Overnight Face Masks To Hydrate Your Skin).
संध्याकाळी जेव्हा आपण थकून भागून घरी येतो, तेव्हा आपण चेहरा स्वच्छ धुतोच. पण त्वचेवरची मरगळ झटकून तिला पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी तेवढं पुरेसं नसतं. यासाठीच साधारण तिशीनंतर रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवा आणि एखादा हायड्रेटिंग स्लिपींग मास्क किंवा नाईट क्रिम लावा, असं सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. चेहऱ्याला पोषण (Honey Aloe vera Night Skin Care Sleeping Facepack) देण्यासाठी रात्री झोपताना त्वचेला काहीतरी मास्क किंवा क्रिम लावणं खरोखरंच गरजेचं आहे. पण महागडे नाईट क्रिम विकत घेऊन तेच त्वचेवर लावणे, हा काही त्यावरचा एकमेव उपाय नाही. म्हणूनच तर त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरणारा स्लिपिंग मास्क घरच्याघरी कसा तयार करायचा आणि त्यामुळे नेमके होणारे फायदे काय, हे आपण बघूया. या ब्यूटी टिप्स इंन्स्टाग्रामच्या organicuaeofficials या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत(Best Overnight Face Masks to Get Healthy Glowing Skin).
साहित्य :-
१. मध - १ टेबलस्पून
२. एलोवेरा जेल - ३ टेबलस्पून
कृती :-
१. एका बाऊलमध्ये ३ टेबलस्पून एलोवेरा जेल घेऊन त्यात १ टेबलस्पून मध घालावे.
२. आता हे एलोवेरा जेल आणि मध चमच्याने व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यावे.
३. त्यानंतर एलोवेरा जेल आणि मधाचा हा स्लिपिंग एका काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवावा.
नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता...
अलायाला आवडणारा लाल फेसमास्क पाहा, चेहरा काळवंडला असेल तर चटकन होईल फ्रेश आणि चमकदार...
हा स्लिपिंग मास्क कसा वापरायचा ?
१. रात्री झाेपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवा. पुसून कोरडा करा आणि त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि एखादा मिनिट हलक्या हाताने मसाज करा.
२. यानंतर चेहरा धुण्याची गरज नाही. आता निवांत झोपा आणि सकाळी उठल्यानंंतर चेहरा धुवा.
३. हा उपाय नियमित केल्यास आठवडाभरातच तुम्हाला त्वचा फ्रेश, टवटवीत झालेली जाणवेल.
४. हा स्लिपिंग मास्क लावून घराबाहेर किंवा धुळीत जाऊ नका.
स्लिपिंग मास्क लावण्याचे फायदे :-
१. त्वचा कायम हायड्रेटेड राहते.
२. पिंपल्सची समस्या असेल तर ती देखील या उपायाने कमी होईल.
३. त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होईल.
४. रात्रभरात मध त्वचेला हिलिंग करण्याचे मुख्य काम करते. मध
५. मध त्वचेच्या जळजळीपासून आराम मिळवून देऊन त्वचा थंड ठेवण्यास मदत करते.
६. कोरफड जेल त्वचा चमकदार करण्यास फायदेशीर ठरते.