Join us  

व्हिटॅमिन सीचे महागडे फेसपॅक वापरता? त्यापेक्षा पपई खा आणि पपईच्या सालांचा करा फेसपॅक, पाहा इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2023 2:26 PM

Papaya Face Pack Benefits For All Skin Types पपई खाणं उत्तमच पण पपईच्या सालांमध्येही अत्यंत उत्तम औषधी जादूई गुणधर्म आहेत.

उन्हाळा सुरु झाला आहे, या दिवसात सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन होते. हे टॅनिंग पपईद्वारे सहज दूर करता येईल. काहींना पपई आवडते तर, काहींना नाही. त्यातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी चे गुणधर्म त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. पपईमध्ये पॅपेन एंजाइम असते. जे त्वचेच्या मृत पेशींची समस्या दूर करतात.

अनेक जण पपईचा वापर करून साल फेकून देतात. पण ते साल फेकून देऊ नका, त्याचा वापर त्वचेसाठी करता येतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक अँड रिसर्च पब्लिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ''पपईच्या सालीमध्ये त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचा कोमल होते. यासह पिगमेंटेशन, मुरुम आणि सुरकुत्या कमी होतात''(Papaya Face Pack Benefits For All Skin Types)

पपईच्या सालीचा वापर करून बनवा फेसपॅक

१ टेबलस्पून किसलेली पपईची साल

१ टेबलस्पून मध

१ टेबलस्पून मॅश केलेली पपई

डोळ्याखालचे डार्क सर्कल्स कमी करायचे आहेत? रोज ५ मिनिटं करा ही सोपी मुद्रा, व्हा टेंशन फ्री

पपईचा फेसपॅक बनवण्याची कृती

सर्वप्रथम, पपईची साल धुवून घ्या. त्यानंतर पपईची सालीचा किस करा, मिक्सरच्या भांड्यात किसलेल्या पपईची साल घ्या. आता त्यात मध आणि मॅश केलेली पपई घालून मिश्रण मिक्स करा.

फेसपॅक तयार झाल्यानंतर मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हे मिश्रण त्वचेवर २० मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून दोनवेळा हा फेसपॅक लावा.

कोरफडीच्या गरात ५ गोष्टी मिक्स करा आणि पाहा चेहऱ्यावर नितळ जादू ! पिंपल्सचा त्रास कमी..

केसांवर करा पपईच्या सालीचा वापर

पपईमध्ये फॉलिक अॅसिड असते, जे केसांमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. ज्यामुळे केसांची वाढ सुधारते. पपईच्या सालीमुळे केसांची वाढ तर होतेच, यासह कोंडा देखील कमी होते.

केसांवर याप्रकारे करा पपईच्या सालीचा वापर

१ टेबलस्पून किसलेली पपईची साल

१/२ कप दही

१ चमचा पपई पल्प

महागडे सिरम-टोनर कशाला? चेहऱ्यावर ग्लो हवा तर वापरा भिजवलेल्या तांदूळाचं पाणी, पाहा जादू

हेअरमास्क बनवण्याची कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात १ टेबलस्पून किसलेली पपईची साल, १/२ कप दही, १ चमचा पपईचा पल्प घ्या. आता हे तिन्ही मिश्रण चांगले बारीक करून घ्या. मिश्रण बारीक झाल्यानंतर केसांवर लावा. केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत हा मास्क संपूर्ण केसांवर लावा. १ तास तसेच ठेवल्यानंतर केस माईल्ड शॅम्पूने धुवून घ्या. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीफळेहोम रेमेडी