Join us  

पपई आइस क्यूब फेशियल; घरच्याघरी हे फेशियल करा, त्वचेचा पोत बदला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 3:12 PM

चेहेरा काही मिनिटात चमकदार करण्यासाठी पपई आइस क्यूब फेशिअल करता येतं. या उपायानं चेहेरा चमकदार तर होतोच शिवाय चेहेऱ्याची त्वचा ही घट्ट होते. ती सैल पडत नाही. उन्हाळ्याच्या काळात त्वचेला थंडावा देण्याचं काम हा उपाय करतो.

ठळक मुद्दे पपईच्या मदतीनं चेहेरा चमकदार करता येतो.पपईमुळे चेहेऱ्यावरील मृत त्वचा सहजपणे निघून जाते. त्वचा चिरकाल तरुण ठेवण्यासाठी पपईचा उपयोग करतात.चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्यांनी पडलेले काळे डाग काढून टाकण्यासाठी पपई खूप चांगलं काम करते.

 सौंदर्योपचारासठी प्रत्येक वेळेस पार्लरमधे जाण्याची गरज नाही. घरातल्या घरात चेहेऱ्यावर पार्लर इफेक्ट आणता येतो. घरगुती उपचारांचा परिणाम हा पार्लरसारखा तातरता राहात नाही. शिवाय या उपायांनी त्वचेचं भरण पोषण ही होतं. चेहेºयावर ब्यूटी पार्लरसारखा ग्लो आणायचा असेल तर पपईचा चांगला उपयोग होतो. पपईही आरोग्यासाठी जितकी फायदेशीर तितकीच ती त्वचेसाठीही असते. चेहेरा चमकदार करण्यासाठी रासायनिक घटक असलेले कॉस्मेटिक्स वापरण्यापेक्षा पपई वापरणं चांगलं उत्तम ठरतं.पपईचे लेप

  •  पपईमधे मोठ्या प्रमाणात अ जीवनसत्त्वं असतं. शिवाय त्यात पैपेन नावाचं विकरही असतं. त्याचा परिणाम म्हणजे पपईमुळे चेहेऱ्यावरील मृत त्वचा सहजपणे निघून जाते. त्वचा चिरकाल तरुण ठेवण्यासाठी पपईचा उपयोग करतात. पपईच्या मदतीनं चेहेरा चमकदार करता येतो. त्यासाठी पपई आणि मधाचा लेप चेहेऱ्यास लावावा. हा लेप तयार करताना अर्धी पपई घ्यावी. त्यात तीन चमचे मध घालावं. हे मिश्रण चांगलं एकजीव करावं आणि चेहेऱ्यावर लावावं. हा लेप वीस मिनिटं राहू द्यावा. नंतर थंड पाण्यानं चेहेरा धुवावा.
  • चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्यांनी पडलेले काळे डाग काढून टाकण्यासाठी पपई खूप चांगलं काम करते. त्यासाठी पपईची एक सालीसकट फोड घ्यावी. आणि ती चेहेऱ्यावर घासावी. हा उपाय नियमित केल्यानं चेहेऱ्यावरचे डाग निघून जातात.

पपईचं आइस  क्यूब फेशिअल

चेहेरा काही मिनिटात चमकदार करण्यासाठी पपई आइस क्यूब्ज फेशिअल करता येतं. या उपायानं चेहेरा चमकदार तर होतोच शिवाय चेहेऱ्याची त्वचा ही घट्ट होते. ती सैल पडत नाही. उन्हाळ्याच्या काळात त्वचेला थंडावा देण्याचं काम हा उपाय करतो, पपईचे हे आइस क्यूब एकदा बनवून पुढचे चार पाच दिवस वापरता येतातपपईच्या आइस क्यूब बनवण्यासाठी पपईची एक फोड घ्यावी. त्यात तीन चमचे गुलाबपाणी , दोन चमचे मध आणि दोन चिमूट हळद घ्यावी. आइस क्यूबसाठी आधी पपई चांगली कुस्करुन घ्यावी. त्यात गूलाबपाणी, मध आणि हळद घालावी. ही घट्टसर पेस्ट बर्फाच्या ट्रे मधे भरावी आणि फ्रिजरमधे ठेवून बर्फ करावा.पपई आइस क्यूबद्वारे फेशिअल करताना आधी चेहेरा फेस वॉशनं स्वच्छ धूवावा. आइस क्यूब ला एका सूती रुमालात गूंडाळावं. जशी रुमालानं जिलेबी करतात तशा पध्दतीनं बर्फ रुमालात घालून पकडावा. या बर्फानं चेहेऱ्याला छान मसाज करावा . डोळ्याखालील भागचाही बर्फाद्वारे मसाज करावा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा आइस क्यूब वापरायची असल्यास एक क्यूब पुरते. पण जर भर दुपारी आइस क्यूब फेशिअल करायचं असेल तर दोन क्यूब्स वापराव्यात.तेलकट त्वचेसाठी आइस क्यूब फेशिअल झाल्यावर चेहेऱ्यावर टोनर लावावं. त्यामुळे त्वचेखाली आर्द्रता टिकून राहाते आणि त्वचा घट्ट होते. त्वचा कोरडी असेल तर फेशिअल झाल्यावर आधी टोनर लावावं आणि मग मॉश्चराइजर चेहेऱ्याला हलका मसाज करत लावावं. मसाज करताना दाब देऊ नये. आणि जर त्वचा सामान्य असेल तर फेशिअल नंतर चेहेऱ्याला टोनर लावावं. आणि मग कोरफड जेल लावावी. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास त्वचेवर चांगली चमक दिसायला लागते.,