आपले केस चित्रपट आणि जाहिरातीतील अभिनेत्रींप्रमाणे सुंदर असावे असं आपल्याला कायम वाटतं. कुरळे किंवा भुरभुरीत केस असतील तर ते सतत मेंटेन करावे लागतात. असे केस एखादवेळी विंचरले नाही तरी आपण लगेच गबाळे दिसतो. अशावेळी आपले केस छान सिल्की आणि शायनी असावेत असे आपल्याला वाटते. मात्र त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन कित्येक तास खर्च करावे लागतात. इतकेच नाही तर या ट्रिटमेंटचा खर्चही खूप जास्त असतो. अशावेळी जास्त खर्च न करता घरच्या घरी कमीत कमी गोष्टी वापरुन स्ट्रेटनिंग करता आले तर? पाहूयात चमकदार, मुलायम केसांसाठी नेमके काय करायचे (Parlour like hair straightening at home Hair Care Tips)...
१. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये १ ग्लास पाणी घालायचे.
२. या पाण्यात २ चमचे जवस आणि २ चमचे तांदळाचे पीठ घालायचे.
३. हे मिश्रण १० मिनीटे चांगले शिजवायचे.
४. घट्टसर झालेले हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर एका बाऊलमध्ये गाळणीने गाळायचे.
५. यामध्ये १ चमचा खोबरेल तेल घालून ते चांगले एकजीव करुन घ्यायचे.
६. तयार झालेले हे हेअर स्पा क्रिम केसांना सगळ्या बाजुने व्यवस्थित लावून घ्यायचे.
७. एक तास हे क्रिम केसांवर तसेच ठेवायचे आणि त्यानंतर केस धुवायचे.
८. या क्रिममुळे केस स्ट्रेट व्हायला मदत होते. इतकेच नाही तर केसांना एकप्रकारे चमक येण्यासही याचा चांगला उपयोग होतो.
तांदूळ आणि जवसाचे फायदे
१. जवसामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्याने ते केसांसाठी फायद्याचे ठरते.
२. जवसापासून तेल काढतात, हा तेलघटक केसांचे पोषण करण्यास उपयुक्त ठरतो.
३. केसांत वारंवार कोंडा होत असेल तरी तो जाण्यासाठी जवसाचा उपयोग होतो.
४. जवसामध्ये असणारे व्हिटॅमिन ई केसांची वाढ, मजबूतपणा यांसाठी महत्त्वाचे काम करते.
५. तांदळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेटस, अमिनो अॅसिड असते. यामुळे केसांची शाईन वाढण्याबरोबरच केस मजबूत होण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
६. तांदूळामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटसचा केसांवर एकप्रकारचा कोट तयार होतो. यामुळे खराब झालेले केस रिपेअर होण्यास मदत होते आणि केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.