आधी सुप्रसिद्ध अभिनेत्री नंतर लेखिका बनलेली ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा देशातील समस्यांवर आपले मत व्यक्त करते आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबत फोटो शेअर करत राहते. आता तिने लंडनहून मुलगा आरवसोबतचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आरव तिच्या कपाळाचे चुंबन घेत आहे.
“रविवारची सकाळ खरोखरच खास आहे. कारण मी माझ्या मुलाला त्याच्या कॅम्पसमधून घेऊन आले आणि आम्ही एकत्र नाश्ता करू शकलो. #sundayshenanigans #LondonDories, ”असं कॅप्शन या पोस्टला ट्विंकलनं दिलं. अक्षय आणि ट्विंकल हे नऊ वर्षांची मुलगी निताराचेही पालक आहेत. आरव आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत सामील होईल की नाही याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत.
मोत्यांच्या माळेचा नवा ट्रेण्ड
प्रदीर्घ काळापासून, अशी कल्पना आहे की मोती फक्त महिलांना वापरण्यासाठीच असतात, किंवा ते फक्त स्त्रियांना चांगले दिसतात. आजकाल असं नाही. सध्या, पुरुषांच्या फॅशनला कोणतेही नियम नाहीत. आणि, जरी ते केले, तरी ते नियम मोडले जातील.
या फोटोतील आरवच्या गळ्यातील माळेनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलंय .सामान्यपणे मुली पारंपारिक पोशाख करताना किंवा अलिकडे ऑफिसवेअरसाठीसुद्धा मोळ्यांच्या माळा किंवा मोत्याचा दागिना घालतात. पण मुलांनी मोत्यांच्या माळा घालणं हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
पुरूषांनी मोत्यांच्या माळा घालणं याला ऐतिहासिक महत्वसुद्धा आहे. 16 व्या शतकाच्या सुरुवातीपासून, भारतातील मुघल साम्राज्याच्या दरम्यान या प्रकारच्या माळांचा वापर वाढला. पूर्वीच्या काळी पुरुषांसाठी मोती हे संपत्ती, शक्ती, खानदानीपणा आणि चांगले रूप यांचे प्रतीक होते.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणवीरसिंगसुद्धा अशा प्रकारची माळ घातल्यानं चर्चेत होता. हटके फॅशनमुळे रणवीरचे कौतुक होते तर कधी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. तरीही वेगवेगळ्या, हटके अशा फॅशन सहजपणे कॅरी करत असतो आणि त्याचे फोटो तो सोशल मीडियावर शेअरही करत असतो.
या फोटोंमध्ये रणवीरने हिरव्या रंगाचा ट्रॅकसूट, हेअर बँड, गळ्यात मोत्यांची माळ आणि डोळ्यांवर मोठा पांढरा गॉगल अशा लूकमध्ये दिसून आला होता. सध्या अधिकाधिक डिझायनर त्यांच्या पुरुषांच्या दागिन्यांच्या संग्रहात मोत्यांचा समावेश करत आहेत.