कितीही इच्छा असली तरी पेडिक्यु्अर, मेनिक्युअर करायचे राहून जाते. कधी वेळ नसतो तर कधी खिशाला परवडत नाही. पण हात आणि पाय सुंदर दिसावे असं वाटतंच. ''आपके पैर देखे, कितने हसीं है, इन्हे जमीं पर ना उतारे'' असं कुणी आपल्याला म्हणणारं नसेल तरी पाय सुंदर दिसायला तर हवेच. मग प्रश्न घरच्याघरी चटकन पेडिक्युअर जमेल का? तर हो , जमेल. त्यासाठीच ही खास स्टेप बाय स्टेप टिप.. फक्त २० रुपयांमध्ये पेडिक्यु्अर घरच्याघरी करता येईल(Pedicure at Home in 3 Easy Steps).
पहिली स्टेप
पहिली स्टेप म्हणजे, पाय काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. यासाठी एका टबमध्ये पाणी घ्या, त्यात शाम्पू, लिंबाचा रस आणि थोडासा बेकिंग सोडा मिक्स करा. या मिश्रणात पाय अर्धा तास भिजवा. २० मिनिटानंतर ब्रशने पाय घासा. जेणेकरून पाय व्यवस्थित स्वच्छ होतील. व मृत त्वचा देखील निघून जाईल. यासह नखं देखील कापून स्वच्छ करा.
पावसाळ्यात केसांचं गळणं जास्त वाढतं, करा ५ रुपयांच्या तुरटीचा सोपा उपाय
दुसरी स्टेप
दुसऱ्या स्टेपमध्ये स्क्रब तयार करा. यासाठी एका वाटीत इनो घ्या, त्यात एक चमचा खोबरेल तेल घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात कॉफी पावडर, साखर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. हे स्क्रब पायांना लावा आणि लिंबाच्या सालीने चांगले चोळा. नखांना चमकवण्यासाठी टूथपेस्टचा वापर करा. नखांवर टूथपेस्ट लावून ब्रशने घासा.
खा तूप मिळेल रुप! चेहऱ्यासह ओठ आणि हातपायांना तूप लावण्याचे ५ फायदे
तिसरी स्टेप
तिसऱ्या स्टेपमध्ये पायांना पॅक लावून मसाज करा, यासाठी एका वाटीत मध, बेसन आणि चंदन पावडर घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायांना लावून मसाज करा. व काही वेळानंतर पाय स्वच्छ धुवा. अशा प्रकारे तुमच्या पायांचे पेडिक्युअर झाले. आपण महिन्यातून २ ते ३ वेळा याचा वापर करू शकता. यामुळे पाय स्वच्छ - सुंदर दिसतील.