ज्या प्रकारे आपण चेहऱ्याची काळजी घेतो तसेच, आपल्याला आपल्या पायांची काळजी घेणे गरजेचे असते. पायांचा थेट संबंध मातीशी येतो. जमिनीवरची घाण पायांना लागते. (Pedicure At Home, Just In 5 Steps)थंडीमध्ये पाय फुटतात. पाय स्वच्छ करण्याकडे आपण फार लक्ष देत नाही. खरं तर पायांची योग्य काळजी घेणे फार गरजेचे असते. (Pedicure At Home, Just In 5 Steps)अगदीच पायांचे पापुद्रे पडल्यानंतर मग ब्यूटी पार्लरला जाऊन आपण पेडिक्युअर करून घेतो.
पार्लरला जायचे म्हणजे खिशाला कात्री लागलीच म्हणून समजा. (Pedicure At Home, Just In 5 Steps)या ट्रिटमेंट खुपच जास्त महाग असतात. त्यामुळे अनेक जणी जाऊ दे पाय कोण बघणार आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? पायांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे किती महाग पडू शकते? शरीराच्या कोणत्याच अवयवाकडे दुर्लक्ष करू नये.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेडिक्युअर करता येते. त्यासाठी घरी असलेलेच सामान वापरायचे आहे. सायदा कायनतने तिच्या चॅनलवर सांगितलेली पद्धत जाणून घ्या.
१.गरम पाणी करून घ्या. त्यात पाय बुडवा आणि स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोमट पाण्यामध्ये घरात असलेला शॅम्पू घाला. त्यात थोडा बेकिंग सोडा घाला. मग एक लिंबू पिळा. त्यात पाय बुडवून बसा. पाय पूर्ण साफ होऊ द्या.
२. नंतर पाण्यातून पाय काढा व स्वच्छ पुसून घ्या. पूर्ण कोरडे करा. मग पायांना कोरफडीचा अर्क लावा आणि मालीश करा. कोरफड जिरायच्या आधीच हेअर रिमुव्हरने पायावरील डेडस्कीन काढून घ्या. पाय स्वच्छ करून घ्या.
३. आता एका वाटीमध्ये चमचा भर बेसन घ्या. त्यामध्ये चमचाभर तांदळाचे पीठ घाला. आणि पेस्ट करण्याएवढंच गुलाब पाणी घाला. ते छान मिक्स करून घ्या. पायांना लावा. सुकू द्या. मग धुऊन टाका.
४. कोणतंही चांगलं मॉइश्चरायझर घ्या. ते पायांना चोळा. बॉडी क्रिमही चालेल.
५. थोडावेळ पाय प्लास्टिक सॉक्समध्ये ठेवा. आणि थोड्या वेळाने प्लास्टिक काढून टाका.
घरच्या घरी पेडिक्युअर करणं फारच सोप आहे. नक्की करून बघा. दुष्परिणाम काही नाहीत.