त्वचेचं सौंदर्य टिकवायचं असेल, वय वाढलं तरी चेहरा छान टवटवीत, तजेलदार दिसावा असं वाटत असेल तर ती काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही. 'पी हळद आणि हो गोरी..' असं काही प्रत्यक्षात होत नसतं.. चेहऱ्याची, त्वचेची काळजी घ्यायची असेल तर काही गोष्टी तुम्ही अगदी विशी- पंचवीशीतच (skin care routine in marathi) सुरू करायला पाहिजेत. जेणेकरून या गोष्टींचा तुमच्या त्वचेवर हळूहळू सकारात्मक परिणाम होईल आणि मग त्वचेचं सौंदर्य टिकून राहिल. म्हणूनच तर ग्लोईंग आणि यंग स्किन पाहिजे असेल, तर अशा पद्धतीने त्वचेची काळजी घ्या. skin care routine in marathi
१. स्किन केअर रुटीन..
skin care routine
तिशीनंतर त्वचा चांगली रहावी, वय वाढल्याची चिन्हे त्वचेवर दिसू नयेत, त्वचा लवकर सुरकुतू नये म्हणून पंचविशीपासूनच त्वचेसाठी ॲण्टी एजिंग स्किन केअर रूटीन (anti aging skin care routine) फॉलो करा. हे रूटीन फॉलो करणं अतिशय सोपं आहे. यासाठी दररोज रात्री झोपण्याच्या आधी क्लिंझिंग लोशन लावून चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर अल्कोहोल फ्री असणारं एखादं टोनर चेहऱ्याला लावा. एखादा मिनिट टोनर त्वचेवर सेट होऊ द्या आणि त्यानंतर ॲण्टी एजिंग नाईट क्रिम लावून चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा.
२. व्यायामाला विसरू नका...
Regular exercise
केवळ बाह्य उपचार करून त्वचेचे सौंदर्य टिकून राहणार नाही. त्यासाठी तुमचे शरीर आतून स्वच्छ होणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता आणि तुम्हाला घाम येतो, तेव्हाच तुमच्या शरीरातून टॉक्झिन्स बाहेर येतात आणि त्वचा नितळ, चमकदार होण्यास मदत होते. म्हणूनच व्यायाम करायला विसरू नका. चालणे, फिरणे, योगा, सायकलिंग असा कोणताही व्यायाम करा. पण त्यातली नियमितता टिकवून ठेवा.
३. आहाराची अशी काळजी घ्या
Proper diet
वरवरचे पोषण त्वचेचा पोत खूप अधिक काळ चांगला ठेवू शकत नाही. त्यामुळेच शरीराला आतून पोषण मिळणे खूप गरजेचे आहे. हे पोषण योग्य आहारातूनच मिळते. त्यामुळे तुमचे रोजचे जेवण सकस असावे. ब्रोकोली, लसूण, कोमटपाणी- मध- लिंबू, ताजी फळे, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश तुमच्या आहारात रोज हवा. यासोबतच दुध, तूप यांचेही प्रमाण योग्य हवे.. जंकफुड खाण्याचे प्रमाण निश्चित ठेवा. महिन्यातून एकदा जंकफूड खा, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र रोजच्यापेक्षा अधिक वर्कआऊट करायला विसरू नका.
४. झोप पुर्ण घ्या...
7 to 8 hours sleep
नाईट लाईफ एन्जॉय करत नसाल, तर काय तुमचं तारूण्य.. असं समजण्याचा आजचा काळ. महिन्यातून एकदा हे सगळं करायला काहीच हरकत नाही. पण हेच तुमचं रुटीन होऊ देऊ नका. कारण त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर रोज रात्री तुमची ७ ते ८ तासांची झोप पुर्ण व्हायलाच हवी. कारण शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होऊ द्यायचं असेल तर रात्री वेळेत झोपलंच पाहिजे. शरीर डिटॉक्स होत गेलं तरच त्वचेचं सौंदर्य टिकून राहतं.