Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात केसातला कोंडा वाढतो, कपड्यांवर पडतो? वापरा देवघरातील ही पांढरी वस्तू, कोंडा होईल गायब...

हिवाळ्यात केसातला कोंडा वाढतो, कपड्यांवर पडतो? वापरा देवघरातील ही पांढरी वस्तू, कोंडा होईल गायब...

Permanent Solution For hair Dandruff Problem In Winter : Best Home Remedies For Dandruff : Effective Remedies & Treatments for Winter Dandruff : Home Remedies For Dandruff In Winter : थंडीच्या दिवसांत स्काल्पला कोरडेपणा येऊ नये तसेच केसांचे आरोग्य व सौंदर्य हिवाळ्यातही टिकून राहावे, यासाठी टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 16:40 IST2024-12-19T16:12:08+5:302024-12-19T16:40:56+5:30

Permanent Solution For hair Dandruff Problem In Winter : Best Home Remedies For Dandruff : Effective Remedies & Treatments for Winter Dandruff : Home Remedies For Dandruff In Winter : थंडीच्या दिवसांत स्काल्पला कोरडेपणा येऊ नये तसेच केसांचे आरोग्य व सौंदर्य हिवाळ्यातही टिकून राहावे, यासाठी टिप्स...

Permanent Solution For hair Dandruff Problem In Winter Home Remedies For Dandruff In Winter Effective Remedies & Treatments for Winter Dandruff | हिवाळ्यात केसातला कोंडा वाढतो, कपड्यांवर पडतो? वापरा देवघरातील ही पांढरी वस्तू, कोंडा होईल गायब...

हिवाळ्यात केसातला कोंडा वाढतो, कपड्यांवर पडतो? वापरा देवघरातील ही पांढरी वस्तू, कोंडा होईल गायब...

हिवाळा ऋतूला चांगलीच सुरुवात झाली आहे. सगळीकडे थंडी पडायला सुरुवात झाली आहे. वातावरणातील वाढत्या थंडीच्या पाऱ्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यातील (Best Home Remedies For Dandruff) सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ड्रायनेस. थंडीच्या दिवसांत केस, त्वचा यांना कोरडेपणा (Effective Remedies & Treatments for Winter Dandruff) येणे ही एक कॉमन गोष्ट आहे. त्वचेसोबतच केस आणि स्काल्पला कोरडेपणा आल्यामुळे केसांचा अनेक तक्रारी निर्माण होतात. अशा परिस्थितीत काहीवेळा स्काल्पची त्वचा ड्राय होऊन उकलून निघते, एवढंच नव्हे तर थंडीच्या दिवसांत ड्रायनेसमुळे केसांतील डँड्रफ देखील वाढतो(Home Remedies For Dandruff In Winter).

स्काल्प कोरडे पडल्याने ऐन हिवाळ्यात केसांत कोंडा होण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. स्काल्पची त्वचा कोरडी पडल्याने त्वचा उकलून निघणे, खाज येणे यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. स्काल्पच्या कोरडेपणामुळे आपले केस देखील तितकेच रुक्ष, निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. यासाठी हिवाळ्यात केस आणि स्काल्पची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यात आपल्या स्काल्पला कोरडेपणा येऊ नये तसेच केसांचे आरोग्य व सौंदर्य हिवाळ्यातही कायम टिकून राहावे, यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळ्यात स्काल्पचा कोरडेपणा कमी करण्यासोबतच डँड्रफ कमी करण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूयात.

हिवाळ्यात केसांतील डँड्रफ कमी करण्यासाठी काय करावे ? 

१. कापूर, खोबरे तेल, लिंबाचा रस :- केसांतील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी कापूर, खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसाचा आपण वापर करु शकता. यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून घ्यावा. मग त्यात बारीक केलेल्या कापूराची पूड घालावी. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. कापूर, खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसाचे हे एकत्रित मिश्रण केसांच्या मुळांशी बोटांच्या मदतीने लावून मालिश करून घ्यावे. त्यानंतर तासभर हे मिश्रण केसांच्या मुळांशी असेच लावून ठेवा. मग केस स्वच्छ धुवून घ्यावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने कोंड्याची समस्या दूर होईल.

२. कापूर आणि ऑलिव्ह ऑईल :- कापूर आणि ऑलिव्ह ऑईल यांच्या एकत्रित मिश्रणाने केसांतील डँड्रफ कमी करण्यास मदत मिळते. यासाठी एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल घेऊन ते व्यवस्थित गरम करुन घ्यावे. आता या गरम तेलात कापूरची बारीक पूड करुन घालावी. आता हे कापूर आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण केसांवर लावून घ्यावे. ऑलिव्ह ऑईल आणि कापूर यांच्या मिश्रणाने केस आणि स्काल्पचा ड्रायनेस कमी होऊन डँड्रफची समस्या देखील दूर होते. 

डोक्यावर पांढरेच केस जास्त दिसतात ? करुन पाहा १ घरगुती नॅचरल उपाय, डाय, मेहेंदी, कलरही होतील फेल...

३. कापूर आणि रिठा :- कापूर आणि रिठा हे नैसर्गिक पद्धतीने केसांतील डँड्रफ कमी करण्यास मदत करतात. यासाठी रिठा रात्रभर पाण्यांत भिजवून ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच पाण्यांत रिठा उकळवून घ्याव्यात. रिठा पाण्यांत उकळवत असताना त्यात कापूर घालावा. रिठा उकळवून झाल्यावर त्याचे पाणी गाळणीने गाळून एका वेगळ्या बाऊलमध्ये घ्यावे. आता हे रिठा आणि कापूरचे पाणी केसांच्या मुळांना व केसांना लावून घ्यावे. यामुळे हिवाळ्यात डँड्रफची वाढलेली समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

अशा तीन पद्धतींनी आपण देवघरातील कापूरचा वापर करून हिवाळ्यात सतावणारी डँड्रफची समस्या कमी करु शकतो.

Web Title: Permanent Solution For hair Dandruff Problem In Winter Home Remedies For Dandruff In Winter Effective Remedies & Treatments for Winter Dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.