उन्हाळ्यात फ्रीजमधे न चूकता बर्फाचा टभरुन ठेवला जातो. सरबतात , पन्ह्यात किंवा खूपच उकडतय, तहान भागत नाही म्हणून पाण्यात बर्फाचा तुकडा टाकून पिल्यास छान ताजतवानं झाल्यासारखं वाटतं. हाच बर्फ उन्हामुळे त्वचेचं जे नूकसान होतं ते भरुन काढण्यासाठीही वापरला जातो याबद्दल माहिती आहे का? अनेक सौंदर्य समस्यांवर बर्फाचा एक छोटा तुकडा उत्तम उपाय करतो. स्वच्छ , निर्जंतुक पाण्याचा बनवलेला बर्फ आपल्या चेहेऱ्यावर सौंदर्याचं तेज आणतो.
सौंदर्य समस्यांवर थंडगार बर्फाचा उपाय१) डोळ्याखालम निर्माण झालेली काळी वर्तूळ फारच चिवट असतात. ती जाता जात नही. त्यासाठी बर्फ उपयोगी पडतो. काकडीचा रस आणि उकळलेलं गूलाब पाणी यापासून बनवलेला बर्फ रोज डोळ्याखालून हळूवार फिरवल्यास काही दिवसातच ही काळी वर्तूळं कमी होतात.
२) उन्हाळ्यात अनेकींना चेहेऱ्यावर मूरुम पुटकुळ्या येण्याचा त्रास होतो. या पूटकूळ्यांनी चेहेरा सूजल्यासारखा दिसतो आणि आगही करतो, चेहेऱ्यावरुन रोज बर्फ फिरवल्यास या पूटकूळ्यांची तीव्रता कमी होते.
३) आपल्या त्वचेवर सूक्ष्म रंध्र असतात. ती चेहेऱ्याच्या त्वचेवरही असतात. या रंध्रातून त्वचा श्वास घेत असते तसेच शरीरातील विषारी घटक घामातून बाहेर टाकत असते. पण धूळ आणि प्रदुषणामूळे ही रंध्र बूजतात, बंदिस्त होतात. त्यामूळे चेहेराही थकल्यासारखा दिसतो, या रंध्रांना स्वच्छ करुन मोकळं करण्याचं काम बर्फ करतो. चेहेऱ्यास नियमित बर्फ लावल्यास चेहेरा स्वच्छ , मऊ आणि चमकदार दिसतो.
४) बर्फ लावल्यामूळे चेहेऱ्याच्या रक्तवाहिन्यांचं काम सुधारतं. चेहेऱ्यास रक्त पुरवठा होतो. त्यामूळे चेहेरा निरोगी राहातो.
५) डोळ्याखाली सूज असल्यास डोळ्यांच्या सौंदर्याला बाधा येते. बर्फाचा तुकडा डोळ्याखालून नियमित फिरवल्यास ही सूज हळूहळू कमी होऊन डोळे पूर्ववत होतात.
६) चेहेऱ्यावर अकाली अनेक कारणांमूळे सूरकूत्या पडतात. पण रोज बर्फाचा वापर केल्यास चेहेऱ्यावरील सूरकूत्या लोप पावतात. चेहेऱ्याची त्वचा घट्ट होण्यास मदत होते.
७) चेहेऱ्यावरील अनावश्यक केसांमूळे चेहेरा काळवंडतो. वॅक्सिंग केल्याने हे केस तात्पूरते कमी होतात. पण पून्हा येतातच. नियमित बर्फ लावल्यास चेहेऱ्यावरील केसांची वाढ कमी होते. बर्फाचा चेहेऱ्यावरील केसांवर परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो. पण बर्फाचा उपाय नियमित केल्यास फरक पडतो.
८) ओठ फाटल्याने , कोरडे झाल्याने रखरखीत होतात. ओठांना मऊ पणा येण्यासाठी बर्फ मदत करतो. रोज ओठांवरुन बर्फ फिरवल्यास ओठांवरच्या जखमा बऱ्या होतात. आणि ओठही मऊ होतात,
९) चेहेऱ्यावर प्रमाणापेक्षा जास्त तेल असल्यास चेहेरा तेलकट दिसतो. शिवाय यामूळे मूरुम , पूटकूळ्याही येतात. पण बर्फ चेहेऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते. त्यामूळे त्वचा चमकू लागते.
१०) चेहेऱ्यास हलक्या मसाजची आवश्यकता असते. हा मसाज जर बर्फाच्या सहाय्याने केल्यास कोमेजलेली त्वचा पूर्नजिवित होते. बर्फाच्या मसाजने चेहेरा छान आनंदी दिसतो.
११) उन्हाळ्यात त्वचा रापते. आग करतेल यावर कोरफडीचा बर्फ परिणामकारक ठरतो. कोरफडचा गर टाकून बर्फ करुन तो चेहेऱ्यावर फिरवल्यास त्वचेचा दाह कमी होतो.
१२) डोळ्यांवर ताण आल्यास डोळे थकलेले दिसतात. डोळ्यांचा थकवा कमी करण्याचं काम बर्फ करतो.
१३) मेकअपला वेळ नसल्यास चेहेºयावर नूसता बर्फ फिरवून नंतर क्रीम लावल्यास चेहेरा छान दिसतो. आणि मेक अप करण्याआधी चेहेऱ्यावरुन बर्फ फिरवल्यास आणि नंतर मेकअप केल्यास लूक ताजातवाना दिसतो आणि मेकअपही छान टिकून राहातो.