Join us  

पिग्मेंटेशन वाढलं, चेहरा डल दिसतोय? २ घरगुती उपाय, डाग कायमचे जातील, ग्लोईंग दिसेल त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:54 AM

Pigmentation Home Remedies : पपई त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते.

सुंदर, डागविरहीत त्वचा मिळवण्यासाठी काहीही करण्याची महिलांची तयारी असते. महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्सपासून अनेक घरगुती उपायांचा वापर महिला करतात. (Skin Care Tips) चेहऱ्यावर वयवाढीच्या खुणा आणि पिग्मेंटेशन येत असेल तर वेळीच योग्य काळजी घ्यायला हवी. त्वचा सुंदर आणि डागविरहीत दिसण्यासाठी घरगुती पदार्थही तितकेच महत्वाचे असतात. (Pigmentation home remedies)

मध, पपई, ओट्स या पदार्थांचा वापर करून तुमच्या चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन कमी होऊ शकतं. त्वचेला नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करण्यासाठी मध अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र स्वच्छ होतात. (Simple Home Remedies for Hyperpigmentation) मध चेहऱ्याची त्वचा मऊ आणि मॉइश्चराइज ठेवण्यास मदत करते. पपई त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. पपईमध्ये असलेले तत्व त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. (Natural Home Remedies for Hyperpigmentation)

पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये २ ते ३ चमचे तांदळाचं पीठ घाला. नंतर यात १ ते २ चमचे मध मिसळा. २ ते ३ चमचे दळलेले ओट्स घाला. वाटण्याासठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता. हे मिश्रण साधारण 20 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. यानंतर कापूस आणि स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा. तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. या फेस पॅकच्या वापराने, तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागेल.

मसूर डाळ

मसूर डाळीची पेस्ट बनवण्यासाठी डाळ रात्रभर पाण्यात किंवा दुधात भिजत ठेवा. आता ग्राइंडरच्या मदतीने या डाळीची पेस्ट बनवा. आता एक चमचा मसूर, मध, दही, लिंबाचा रस आणि दुधाची पेस्ट घ्या. हे सर्व एका भांड्यात घेऊन मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण हाताच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हे मिश्रण लावल्यास चांगले परीणाम दिसून येतील.

तुळस

तुळस आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेवपर वापरण्यासाठी 10 ते 15 तुळशीची पाने बारीक करा. आता त्यात लिंबाचा रस टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण फक्त प्रभावित भागावर लावा. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटांनी सामान्य पाण्याने धुवा. पिग्मेंटेशन दूर करण्यासोबतच पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी