Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरचे पिंपल्स नखाने फोडताय? ही सवय सोडा नाहीतर चेहरा कायमचा होईल खराब कारण...

चेहऱ्यावरचे पिंपल्स नखाने फोडताय? ही सवय सोडा नाहीतर चेहरा कायमचा होईल खराब कारण...

Pimple Popping Bad for Skin Health : Why Is It So Bad to Pop a Pimple : How bad is it to pop your pimples : पिंपल्स फोडण्याची सवय मोडा, नाहीतर स्किन दिसेल खराब होतील अनेक स्किन प्रॉब्लेमस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 08:46 PM2024-09-23T20:46:07+5:302024-09-23T20:48:51+5:30

Pimple Popping Bad for Skin Health : Why Is It So Bad to Pop a Pimple : How bad is it to pop your pimples : पिंपल्स फोडण्याची सवय मोडा, नाहीतर स्किन दिसेल खराब होतील अनेक स्किन प्रॉब्लेमस...

Pimple Popping Bad for Skin Health Why Is It So Bad to Pop a Pimple How bad is it to pop your pimples | चेहऱ्यावरचे पिंपल्स नखाने फोडताय? ही सवय सोडा नाहीतर चेहरा कायमचा होईल खराब कारण...

चेहऱ्यावरचे पिंपल्स नखाने फोडताय? ही सवय सोडा नाहीतर चेहरा कायमचा होईल खराब कारण...

आपल्या त्वचेवर पिंपल्स येणे ही एक कॉमन समस्या आहे. आपल्यापैकी प्रत्येकजणींनी त्वचेवर पिंपल्स आल्याचा अनुभव एकदा तरी घेतला असेलच.  त्वचेवर वारंवार येणाऱ्या पिंपल्समुळे काहीजणी हैराण होऊन हे पिंपल्स नखाने फोडतात. अनेकींना बऱ्याचदा ते फोड फोडल्याशिवाय (Why Is It So Bad to Pop a Pimple) राहवत नाही. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय सोपा वाटत असला तरी पिंपल्स (Pimple Popping a Bad Habit) फोडण्यामुळे त्वचेचे जास्त नुकसान होते. त्वचेवर आलेले पिंपल्स आपोआप बरे होण्यासाठी आपल्या शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेला थोडा वेळ द्यावा लागतो(How bad is it to pop your pimples).

त्वचेवर आलेले पिंपल्स खराब दिसतात त्यामुळे ते फोडून टाकण्याची अनेकांची सवय असते. या पिंपल्स फोडण्याच्या सवयीला 'पिंपल्स पॉपिंग' असे म्हटले जाते. वरवर पाहता ही नेहमीची पिंपल्स फोडण्याची सवय तुमच्या वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेम्सचे गंभीर कारण ठरु शकते. त्वचेवर आलेले पिंपल्स फोडल्यानंतर त्याचे काळे डाग आपल्या त्वचेवर राहतात, या काळ्या डागांमुळे देखील आपली त्वचा अधिक खराब दिसते. त्वचेवर आलेले पिंपल्स सतत फोडल्याने स्किन इंन्फेक्शन,चेहऱ्यावर डाग आणि मुरुमांची आणखी वाढ होऊ शकते. गुरुग्राम येथील बिर्ला हॉस्पिटल मधील डर्माटॉलॉजिस्ट डॉ. रुबेन भसीन पासी यांनी 'पिंपल्स पॉपिंग' करण्याची सवय आपल्या त्वचेचेसाठी किती हानिकारक आहे ते सांगितले आहे(Pimple Popping Bad for Skin Health).

१. त्वचेवर आलेले पिंपल्स फोडू नये कारण... 

डॉ. रुबेन भसीन पासी सांगतात की, पिंपल्स फोडणे हा पिंपल्स घालवण्याचा सोपा मार्ग वाटत असला तरी प्रत्यक्षात असे केल्याने आपल्या स्किनचे अनेक तोटे होऊ शकतात. पिंपल्स नखाने फोडल्याने त्या ठिकाणी जळजळ आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पिंपल्स फोडताना  त्यातील बॅक्टेरिया, तेल आणि मृत पेशी त्वचेत खोलवर जाऊ शकतात. त्यामुळे त्याच ठिकाणी नवीन पिंपल्स येऊ लागतात. यामुळे, पिंपल्सचा आकार वाढतो आणि ते बरे होण्यास जास्त वेळ लागू शकतो, यामुळे पिंपल्स पिंपल्स कधीही फोडू नयेत. 

बॉलिवूड अभिनेत्रीही आता म्हणतात हेअर ट्रिटमेंट नको, नीता अंबानींचा हेअर स्टायलिस्ट सांगतो मुख्य कारण... 

२. पिंपल्स फोडल्याने पडतात काळे डाग... 

वारंवार पिंपल्स नखाने फोडल्याने आपल्या त्वचेवर त्याचे काळे डाग कायमसाठी राहू शकतात. जेव्हा तुम्ही पिंपल्स फोडता तेव्हा तुम्ही त्वचेखालील ऊतींना नुकसान पोहोचवता. यामुळे त्वचेला सूज येते आणि त्वचेवर कायमसाठी काळे डाग पडू शकतात, जे कालांतराने मिटतात परंतु पूर्णपणे निघून जात नाहीत.

अभिनेत्री रोशनी चोप्रा सांगते, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सिक्रेट ड्रिंकची रेसिपी, स्किनवर गुलाबी ग्लो कायम...

३. स्किन इंन्फेक्शन  

पिंपल्स फोडणे म्हणजे आपल्या हातावर असलेल्या बॅक्टेरियांना त्वचेत प्रवेश करण्यासाठीचे एक खुले दार आहे. या पिंपल्समुळे जास्त वेदना होतात आणि बरे होण्यास जास्त वेळ लागतो. पोपिंग पिंपल्समुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. जेव्हा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसतात तेव्हा आपल्याला असे वाटते की यामुळे आपले सौंदर्य कमी झाले आहे. खरंतर, मुरुमांद्वारे आपल्या त्वचेच्या आत असलेली घाण साफ होते. पिंपलमध्ये असलेल्या बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एकामागून एक मुरुम दिसू शकतात. त्यामुळे तुम्हालाही पिंपल्सचा त्रास होत असेल तर ते नैसर्गिकरित्या बरे होऊ द्या.

बाटलीतील आयलायनर सुकले? ही घ्या तेच लायनर लावण्याची एक भन्नाट ट्रिक, झटपट सोल्यूशन...

४. पिंपल्स आले असतील तर अशी घ्या काळजी... 

१. तुमचा चेहरा हलक्या हाताने धुवा - तुमचा चेहरा कोमट पाण्याने हळुवार धुवा आणि सौम्य क्लिंजर वापरा.
२. आपले हात स्वच्छ ठेवा - आपल्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात नेहमी धुवा.
३. नॉन-कॉमेडोजेनिक उत्पादने वापरा - त्वचेची छिद्र बंद न करणारे स्किन प्रॉडक्ट्सचा वापर करा. 
४. सनस्क्रीन लावा - सूर्यकिरणांपासून पिंपल्सचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लावा .
५. त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या - जर तुमचे पिंपल्स गंभीर असतील किंवा तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Pimple Popping Bad for Skin Health Why Is It So Bad to Pop a Pimple How bad is it to pop your pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.