Lokmat Sakhi >Beauty > Pimple removal home remedies : सतत पिंपल्स येतात, अन् काळे डागही पडतात? डागविरहीत, ग्लोईंग त्वचेसाठी हे घ्या उपाय

Pimple removal home remedies : सतत पिंपल्स येतात, अन् काळे डागही पडतात? डागविरहीत, ग्लोईंग त्वचेसाठी हे घ्या उपाय

Pimple removal home remedies : पाण्यामुळे त्वचा आतून चमकते, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. पचण्यायोग्य अन्नाचा आहारात समावेश करा. अशा गोष्टी खा, ज्या सहज पचतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:57 AM2022-01-28T11:57:42+5:302022-01-28T12:57:20+5:30

Pimple removal home remedies : पाण्यामुळे त्वचा आतून चमकते, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. पचण्यायोग्य अन्नाचा आहारात समावेश करा. अशा गोष्टी खा, ज्या सहज पचतील.

Pimple removal home remedies : Ayurvedic expert shares tips to get rid of acne problem | Pimple removal home remedies : सतत पिंपल्स येतात, अन् काळे डागही पडतात? डागविरहीत, ग्लोईंग त्वचेसाठी हे घ्या उपाय

Pimple removal home remedies : सतत पिंपल्स येतात, अन् काळे डागही पडतात? डागविरहीत, ग्लोईंग त्वचेसाठी हे घ्या उपाय

कोरड्या, तेलकट, मध्यम स्वरूपाच्या प्रत्येक त्वचेवर मुरुमांची समस्या असते. (Acne Problem)  काही स्त्रियांसाठी, हा त्रास अंतर्गत समस्यांमुळे असू शकतो. याशिवाय शुद्ध रक्ताच्या कमतरतेमुळेही ही समस्या सुरू होते.  असे होण्यामागे अनेक कारणे आहेत, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.  हार्मोनल असंतुलन हे एक मुख्य कारण आहे, ज्यामध्ये महिलांच्या चेहऱ्यावर मुरुम वारंवार होतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या तज्ञाचा सल्ला घेऊन सकस आहार, व्यायाम इत्यादींद्वारे या समस्येला सामोरे जाऊ शकते. यामुळे मुरुमेही सहज बरी होतात. (Ayurvedic expert shares tips to get rid of acne problem)

जर मुरुमांची समस्या रक्ताच्या विकारामुळे होत असेल, तर तुम्हाला तुमच्या दिनचर्येत काही बदल करणे आवश्यक आहे. त्यासासाठी रक्त विकार सुधारणे आवश्यक आहे. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आयुर्वेदिक तज्ज्ञ दिक्षा भावसार यांनी सुचवलेल्या या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. रक्ताच्या विकारांमुळे होणाऱ्या मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी या टिप्स प्रभावीपणे काम करू शकतात. 

पिंपल्सपासून बचावासाठी हेल्दी रूटीन

१) पाण्यामुळे त्वचा आतून चमकते, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. पचण्यायोग्य अन्नाचा आहारात समावेश करा. अशा गोष्टी खा, ज्या सहज पचतील.

२) मसालेदार, शिळे, अति गोड किंवा खारट अशा गोष्टी आहारात घेऊ नका. 

३) घरचे जेवण शुद्ध तर असतेच पण आरोग्यासाठीही चांगले असते. म्हणून रोज घरचं खाण्याला प्राधान्य द्या. दररोज रात्री 6 ते 7 तासांची झोप घ्या. चांगली झोप शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करते. 

४) चेहऱ्यावर कोणतेही केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरू नका.  फक्त आणि फक्त नैसर्गिक मार्गाने त्वचा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसातून २ ते ३ वेळा चेहरा धुवा.

पिंपल्स दूर घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

आयुर्वेदात रक्त स्वच्छ करण्यासाठी अशी अनेक औषधे आहेत, जी मुरुमे दूर करण्यासाठी प्रभावी मानली जातात. मात्र, आजकाल अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी या आयुर्वेदिक गोष्टी बनवायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत, ते सेवन करण्यापूर्वी, कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

अनेक वेळा चेहऱ्यावर एकामागून एक मुरुमे येऊ लागतात.  याचे कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामागील कारण जाणून घेतल्याशिवाय असे कोणतेही औषध किंवा क्रीम चेहऱ्यावर लावू नका. शुद्ध रक्ताच्या कमतरतेमुळे अशा समस्या अनेकदा उद्भवतात. त्यामुळे घाई करू नका. काही वेळा चुकीच्या औषधांच्या वापरामुळे दुष्परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे औषधे घेण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Pimple removal home remedies : Ayurvedic expert shares tips to get rid of acne problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.