कोणत्याही स्त्रीला आपली त्वचा ही सुंदर आणि डागविरहीत दिसावी असेच वाटत असते. परंतु, इतर अवयवांप्रमाणे चेहऱ्याच्या निगडित देखील अनेक समस्या उद्भवतात. आपण कितीही काळजी घेतली, तरी देखील खराब जीवनशैली, वेळेवर न जेवणे, तेलकट त्वचा आणि प्रदूषण अशा अनेक समस्यांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, फोडी यांसारख्या समस्या उद्भवतात. चेहऱ्यावरील पिंपल्स लपविण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रोडक्टचा वापर करतो. पिंपल्स जरी गेले तरी पिंपल्स उठणाऱ्या जागांवर डाग तसेच राहतात. हे डाग आपण घरगुती उपायांचा वापर करून कमी अथवा कायमचे त्यांना बाय - बाय करू शकता. फेसपॅक बनवण्याचे दोन मार्ग आहेत जे आपल्याला पिंपल्सपासून मुक्त करण्यास मदत करू शकतात.
दही बेसन फेसपॅक
दही आणि बेसनचा फेसपॅक कित्येक स्किन प्रॉब्लेमसाठी महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर मानला जातो. खास गोष्ट ही आहे की, या फेसपॅकचा वापर त्वचेतील घाण दूर करण्यास सुद्धा होतो. चेहऱ्यावर खड्डे असतील तर आपण हा फेसपॅक रोजच वापरला पाहिजे. मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी, 1-2 चमचे बेसन आणि 1-2 चमचे दही आवश्यक आहे. एका भांड्यात बेसनाचे पीठ दह्यात मिसळा. मग एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. बेसन तेलकटपणा आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करेल. चेहऱ्यावरील पेस्ट कोरडे होऊ द्या आणि नंतर धुवा. रोज 10 मिनिटे हा फेस पॅक त्वचेवर लावा आणि कोमट पाण्याने त्वचा क्लीन करा.
दालचिनी आणि मध
मध शरीरासह चेहऱ्यावर देखील गुणकारी आहे. हा फेस पॅक बनवण्यासाठी १ चमचा मध आणि चिमूटभर दालचिनी पावडर घ्या. नंतर दोन्ही साहित्य एकत्र मिक्स करा. हे मिश्रण पिंपल्सच्या जागांवर लावा. पाच ते दहा मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा. मुरुम निघून जाईपर्यंत दिवसातून एकदा ही प्रक्रिया करा. दालचिनी मधाबरोबर त्वचा स्वच्छ ठेवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. हिवाळ्यात या फेसपॅकचा अधिक फायदा होतो.
महत्त्वाची गोष्ट
चेहऱ्यावर दिसणारे खड्डे तेव्हाच नीट होऊ शकतात जेव्हा मुरुमांची समस्या पूर्णपणे नष्ट होईल. जर पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपण कोणती ब्यूटी ट्रीटमेंट यासाठी घेत असाल तर हे फेसपॅक आता वापरून पाहू नका. दोन पद्धती एका वेळी अप्लाय करणे उचित नाही यामुळे स्किनला मोठा त्रास होऊ शकतो.