प्रत्येकाला असे वाटते की आपले केस हे काळेभोर, लांब, दाट दिसावे. परंतु, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांची निगा राखणे अनेकांना जमत नाही. आपण पाहिलं असेल की कमी वयातच लोकांचे केस पांढरे होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर पांढरा केस दिसतो, तेव्हा अनेक लोकं त्याला विविध सल्ले देतात. त्यापैकी एक म्हणजे की पांढरा केस तोडू नको? पण असे का? पांढरा केस उपटल्याने टाळूवर अधिक पांढऱ्या केसांची वाढ होते. असा लोकांचा समज आहे. पण हे कितपत खरं आहे?(Plucking White Hair Cause More Greying – True or Myth).
यासंदर्भात, युएएमएस फॅमिली आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचे फिजिशियन एम.डी. डॉ. शस्कांक क्रॅलेटी सांगतात, '' हे एक मोठे असत्य आहे. पांढरे केस उपटल्याने इतर केसांची वाढ पांढरी होत नाही. कारण प्रत्येक केसांची वाढ ही त्यांच्या फॉलिकल्सनुसार होते. प्रत्येक केस हे दुसऱ्यापासून स्वतंत्र आहे, जोपर्यंत फॉलिकल्समधील पिग्मेंट सेल्स नष्ट होत नाही. तोपर्यंत केस पांढरे होत नाही. केस ऑक्सिडेटिव्ह नुकसानीमुळे रंग गमावतात. केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आनुवंशिकता आणि पौष्टिक कमतरता देखील याला कारणीभूत ठरू शकतात.''
दोन गोष्टी शाम्पूत मिसळा आणि करा घरच्याघरी हेअरस्पा, केस चमकतील-पार्लरचा खर्चही वाचेल
केस पांढरे होण्याची कारणे
- वाढतं वय हे केस पांढरे होण्यामागे प्रमुख कारण आहे. परंतु, केस अकाली पांढरे होत असतील तर, यामागे अनेक कारणे असू शकतात. बिघडलेली जीवनशैली, योग्य आहाराचे सेवन न करणे, आनुवंशिकता या कारणांमुळे केस पांढरे होऊ शकतात.
- शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील केस पांढरे होऊ शकतात. जसे की जीवनसत्वे बी-६, बी-१२, डी आणि ई ह्यांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.
- केसांवर अतिप्रमाणात रासायनिक प्रक्रियांचा वापर केल्याने, किवा विविध केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने केस पांढरे होऊ शकतात. यासह केस गळतीची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
पांढऱ्या केसांवर उपाय
- पांढरे केस हे अनेकदा अधिक ताण घेतल्याने देखील होते. त्यामुळे मानसिक तणाव कमी करा, नियमित योगा करा.
- केसांवर कमी रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास, केसांची वाढ पांढरी होत नाही. केसांची निगा राखण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यास, केस पांढरे होणे टळू शकते.
खोबरेल तेल रात्री लावा, सकाळी पहा जादू, पिवळे दात ते तुटकी नखे - समस्या गायब
- आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांवर तेलाने मसाज करा. केस वेळच्या वेळी धुवा. हवेतील प्रदूषणापासून केसांना सुरक्षित ठेवा.
- केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य आहाराचे सेवन करा, यामुळे शरीरात कोणत्याही पोषकतत्वांची कमतरता उद्भवणार नाही. ज्यामुळे केस अकाली पांढरे होणार नाही.