Lokmat Sakhi >Beauty > नाकातील केस काढावे का? संसर्ग होण्याचा गंभीर धोका, नाक सांभाळा, फॅशनच्या नावाखाली जीवाशी खेळ...

नाकातील केस काढावे का? संसर्ग होण्याचा गंभीर धोका, नाक सांभाळा, फॅशनच्या नावाखाली जीवाशी खेळ...

Why You Should Never Wax or Pluck Your Nose Hair, According to the Experts : नाकातील केस काढण्यासाठी वॅक्सिंग करणे, या पर्यायाने नाकाला गंभीर इजा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 11:37 AM2023-08-15T11:37:50+5:302023-08-15T11:53:30+5:30

Why You Should Never Wax or Pluck Your Nose Hair, According to the Experts : नाकातील केस काढण्यासाठी वॅक्सिंग करणे, या पर्यायाने नाकाला गंभीर इजा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते...

Plucking Your Nose Hair - Reasons Why You Must Stop Doing It Today. | नाकातील केस काढावे का? संसर्ग होण्याचा गंभीर धोका, नाक सांभाळा, फॅशनच्या नावाखाली जीवाशी खेळ...

नाकातील केस काढावे का? संसर्ग होण्याचा गंभीर धोका, नाक सांभाळा, फॅशनच्या नावाखाली जीवाशी खेळ...

स्किन व्हॅक्सिंग हा महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. हात, पाय, अप्पर लिप्स, अंडरआर्म्स अशा विविध भागातील लहान लहान केस काढून टाकण्यासाठी मुळात व्हॅक्सिंग केलं जात. सध्या हाता - पायांचे, अंडरआर्म्सचे केस काढण्यासोबतच नोज वॅक्सिंग देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर केलं जात. अनेक स्पा किंवा पार्लरमध्ये सध्या 'नोज वॅक्सिंग' करण्याचा एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. यासाठी काही एक्स्पर्टस नेमलेले असतात जे 'नोज वॅक्सिंग' अतिशय काळजीपूर्वक करून देतात. 

मानवी शरीरातील प्रत्येक पेशी आणि शरीराच्या अवयवांना महत्त्वाची भूमिका असते. ज्याप्रमाणे नाक आपल्याला वास घेण्यास आणि श्वास घेण्यास मदत करते, त्याचप्रमाणे नाकातील केस किंवा नाकातील केस धुळीचे कण शरीरात जाण्यापासून रोखण्याचे काम करतात. नाकातील केसांच्या मदतीने, ऍलर्जी आणि संक्रमण टाळले जाते. काही लोकांच्या नाकातील केस नाकाच्या भागाबाहेर वाढतात. त्यानंतर त्यांना नाकातील केस काढण्याची गरज भासते, परंतु नाकातील केस काढणे ही एक धोकादायक प्रक्रिया आहे, त्यामुळे नाकातील केस वॅक्सिंग करताना विशेष काळजी घेतली पाहिजे, तसेच नाकातील केस काढावेत की काढू नये हा पण एक महत्वाचा मुद्दा ठरतो(Plucking Your Nose Hair - Reasons Why You Must Stop Doing It Today).

नाकातील केस काढावेत की काढू नये ? 

मिरर या इंग्रजी वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार, नाकातील केस आपल्या चांगल्या आरोग्यासाठी फारच फायद्याचे ठरतात. हे केस हवेतील धूळ, माती फुफ्फुसांमध्ये जाण्यापासून रोखतात. पण जेव्हा हे केस वाढतात तेव्हा ते नाकपुड्यांच्या बाहेर यायला लागतात. ते दिसायला फारच विचित्र दिसत. हे केस वाढले की नाकातही सतत वळवळ करतात, त्यामुळे हे केस काढून टाकणे हाच एक उत्तम पर्याय असतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की नाकातील केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा वापर केल्यास नाकामध्ये गंभीर संसर्ग होऊ शकतो, ज्याला नाकातील 'वेस्टिब्युलायटिस' म्हणतात. इतकेच नाही तर त्यामुळे जळजळ, खाज आणि दुखण्याची समस्याही उद्भवू शकते. याचबरोबर कधीकधी फोड आणि सूज अशा गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. 

रोजच्या २ सवयींमुळे हार्मोनल असंतुलन वाढते, शरीरासह मनाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम...

आयब्रो करताना वेदना होवू नयेत म्हणून ७ टिप्स, आग होणे विसरा आणि करा न घाबरता आयब्रो...

संसर्ग होण्याचा धोका असतो... 
 
नाकातील केस धुळीचे कण आणि इतर प्रदूषण शरीरात जाण्यापासून रोखतात. डॉ. निकोल एरोन्सन म्हणाले की वॅक्सिंग केल्यामुळे नाकातील केस समूळ नष्ट केले जातात, याचाच अर्थ कोणताही जीवाणू सहजपणे नाकावाटे शरीरातील ऊतींमध्ये प्रवेश करू शकतो आणि संसर्ग होऊ शकतो. 

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस...

पहिल्यांदाच बिकिनी वॅक्सिंग करताना ७ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अवघड जागेचं दुखणं विकत घ्याल...

वॅक्सिंग पेक्षा इतर पर्याय ठरतील उपयोगी... 

डॉ. निकोल एरोन्सन, यांनी नाकातील केस वॅक्सिंगने समूळ नष्ट करण्यापेक्षा ते ट्रिम करण्याचा महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. अलीकडेच बाजारात नाकातील केस ट्रिम करण्यासाठी इलेक्ट्रिक शेवर अटॅचमेंट विकत मिळतात. या उपकरणांचा वापर करून आपण नाकातील केस अतिशय सहज पद्धतीने ट्रिम करू शकता. यासोबतच लेजर ट्रिटमेंट्सचा वापर करून देखील आपण हे केस काढू शकता. तसेच नाकातील अतिरिक्त वाढलेले केस छोट्या कात्रीच्या मदतीने देखील कापू शकता.

Web Title: Plucking Your Nose Hair - Reasons Why You Must Stop Doing It Today.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.