Join us  

कोण म्हणतं पोनी टेल आऊटडेटेड? पाहा आलिया भट, कियारा अडवाणी-दीपीका पदूकोणच्या पोनीटेल हेअरस्टाइल-सोप्या-स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2022 3:44 PM

Ponytail Hairstyle Tips : सुटसुटीत आणि तरीही ट्रेंडी दिसणारी ही हेअरस्टाइल तुम्ही कोणत्याही प्रसंगी कॅरी करु शकता.

ठळक मुद्देबॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे तुम्हीही कॅरी करु शकता पोनीटेलची झक्कास हेअरस्टाईलपोनीटेल आऊटडेटेड नाही, तर सुटसुटीत आणि तरीही ट्रेंडी दिसणारा सोपा प्रकार

आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल किंवा एखादा सण असेल तरी काय घालायचे याबरोबरच महिलांना पडणारा आणखी एक प्रश्न म्हणजे केसांचे काय करायचे. अगदी ऑफीसला किंवा एखाद्या मिटींगला, फिरायला असे कुठेही जाताना नेमकी कशी हेअरस्टाइल केली तर आपण चांगले दिसू असा प्रश्न आपल्याला कायम असतो. मोकळे केस तर चांगले दिसतातच पण हे केस सतत गळ्यात नको असतील तर ते बांधलेले जास्त बरे वाटतात. त्यामुळे उकडतेही कमी आणि सतत केस गळ्यात असल्यामुळे ते सावरण्याची चिंता नसते. पूर्वी घातली जाणारी वेणी ज्याप्रमाणे आता पुन्हा फॅशन म्हणून घातली जायला लागली त्याचप्रमाणे पोनीटेलही पुन्हा एकदा फॅशन इन झाला आहे (Ponytail Hairstyle Tips). 

(Image : Google)

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीही अतिशय आवडीने करत असलेली ही पोनीटेल हेअरस्टाईल सुटसुटीत तरी छान दिसणारी असते. आलिया भेट, कियारा अडवाणी आणि दिपिका पदूकोणसारख्या अभिनेत्रींनाही पोनीटेल बांधलेला आवडतो. केस मोकळे सुटले की अनेकदा त्यात गुंता होण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळ्याच्या दिसवात येणारा घाम, पावसाळ्यात ओले होणारे केस यांपेक्षा केसांचा पोनीटेल बांधलेला असेल की ते फार सांभाळावे लागत नाहीत. एरवी आपण घरात काम करणे सोयीचे जावे म्हणून केसांचा आंबाडा किंवा पोनीटेल बांधतो. पण ऑफीसमध्ये काम करताना, सणावाराला किंवा कुठे फिरायला जातानाही ही हेअरस्टाईल कॅरी करता येऊ शकते. या हेअरस्टाईलमध्ये तुमचे फिचर्सही छान उठून दिसू शकतात आणि केसही चांगले राहण्यास मदत होते. 

आलिया भट

आलिया भटचे सौंदर्य शब्दात सांगता येण्यापलिकडे आहे. त्यामुळे वेस्टर्न कपडे असो किंवा पारंपरिक साडी ती कशातही तितकीच सुंदर दिसते. आलियाचे केस कुरळे असल्याने तिला पोनीटेल छान दिसतो. तिच्या अनेक फोटो किंवा व्हिडिओमध्ये ती पोनीटेल बांधलेली दिसतेही. त्यातही मध्यभागी भांग पाडून दोन भाग केले आणि मानेवर खाली पोनीटेल बांधला तर तिचे फिचर्स आणखीनच स्मार्ट दिसतात. यामुळे आपले केसही दाट आहेत असा फिल पाहणाऱ्याला येतो. त्यामुळे तुमचेही केस कुरळे असतील तर तुम्ही आलियासारखा पोनीटेल नक्की ट्राय करु शकता. 

कियारा अडवाणी 

आपले केस खूप कोरडे आणि फुगणारे असतील तर ते नीट बसवण्यासाठी काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यातही आपले केस पूर्ण सरळही नसतात आणि पूर्ण कुरळेही नसतात. अशावेळी कियारा अडवाणी ज्याप्रमाणे डोक्याच्या मध्यभागी एक साधासा पोनीटेल बांधते तसा आपण ट्राय करु शकतो. डिझायनर ब्लाऊज, हेवी कानातले अशा मेकअपमध्ये हा पोनीटेल लूक खुलून येऊ शकतो. त्यातही आपण साडी किंवा एखादा हेवी पंजाबी सूट घालणार असून तर कपडे आणि केस दोन्ही सांभाळताना आपली तारेवरची कसरत होते अशावेळी पोनीटेल हा चांगला पर्याय ठरु शकतो. 

अनन्या पांडे 

अभिनेत्री अनन्या पांडे ही अभिनेत्रीही अनेकदा डोक्यावर थोड्या वरच्या बाजूला पोनीटेल घालते. आपल्या केसांचा पोत, त्यांची उंची हे लक्षात घेऊन आपल्याला कशाप्रकारचा पोनीटेल सूट होईल हे आपण ठरवू शकतो. पोनीटेल हा एरवी आपण गरज म्हणून बांधत असलो तरी फॅशन म्हणूनही थोड्या हटके पद्धतीने तो बांधला तर एक झटपट होणारी हेअरस्टाईल म्हणून आपण ती करु शकतो. यामुळे तुम्ही फॅशनेबल कपडे किंवा दागिने घातले असतील तर त्यांची फॅशन दिसण्यासही मदत होते.  

दिपिका पदूकोण 

प्रसिद्ध अभिनेत्री दिपिका पदूकोण खेळाडू असल्याने पोनीटेल ही तिच्या आवडीची हेअरस्टाईल असते. छान उंची असणारी दिपिका मध्यभागी भांग पाडून किंवा भांग न पाडता पोनीटेल घातलेली दिसते. अशावेळी ती डोळ्यांचा आणि ओठांचा थोडा बोल्ड मेकअप कॅरी करु शकते. सध्या बाजारात पोनीटेलला बांधायला वेगवेगळ्या फॅशनचे, रंगांचे रबरबॅंड उपलब्ध असून या फॅशनही आपण पोनीटेलच्या निमित्ताने ट्राय करु शकतो.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीबॉलिवूडआलिया भटकियारा अडवाणीदीपिका पादुकोण