Lokmat Sakhi >Beauty > Post facial care tips : फेशियलनंतर 'या' चुका केल्यानं हमखास पिंपल्स येतात; मनासारखा ग्लो मिळवण्यासाठी अशी घ्या काळजी

Post facial care tips : फेशियलनंतर 'या' चुका केल्यानं हमखास पिंपल्स येतात; मनासारखा ग्लो मिळवण्यासाठी अशी घ्या काळजी

Post facial care tips : फेशियल केल्यानंतर महिला अशा काही चुका करतात, ज्यामुळे फेशियलचा फायदा मिळण्याऐवजी साईड इफेक्ट निर्माण होतात. यामुळे त्वचा चमकत नाही, उलट ती अधिक निस्तेज दिसू लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:57 PM2022-02-28T17:57:10+5:302022-02-28T18:04:45+5:30

Post facial care tips : फेशियल केल्यानंतर महिला अशा काही चुका करतात, ज्यामुळे फेशियलचा फायदा मिळण्याऐवजी साईड इफेक्ट निर्माण होतात. यामुळे त्वचा चमकत नाही, उलट ती अधिक निस्तेज दिसू लागते.

Post facial care tips : Dont do these mistakes after facial if you want to get perfect glow on your skin | Post facial care tips : फेशियलनंतर 'या' चुका केल्यानं हमखास पिंपल्स येतात; मनासारखा ग्लो मिळवण्यासाठी अशी घ्या काळजी

Post facial care tips : फेशियलनंतर 'या' चुका केल्यानं हमखास पिंपल्स येतात; मनासारखा ग्लो मिळवण्यासाठी अशी घ्या काळजी

काळपट, निस्तेज त्वचेला सुंदर बनवण्यासाठी प्रत्येकजण पार्लरला जाऊन किंवा घरगुती साहित्याच्या वापरानं फेशियल करत असतो. फेशियल करताना त्वचेवर रिएक्शन येऊ नये (How to maintain a post facial glow) आणि त्याचा पुरेपूर ग्लो मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्यथा महागडं  फेशियल करूनही काही उपयोग होत नाही. म्हणून या लेखात तुम्हाला फेशियल करताना कोणत्या चुका टाळायच्या याबाबत सांगणार आहोत. (The Dos And Don'ts After A Facial) बहुतेक सौंदर्य तज्ञ मानतात की वयाच्या 30 नंतर प्रत्येक स्त्रीने महिन्यातून एकदा तरी फेशियल करणे आवश्यक आहे.

यामुळे चेहऱ्यावर ग्लो राहतो. तसेच चेहऱ्याची त्वचा घट्ट होते, त्यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव लवकर दिसत नाही. (Steps to Maintaining Your Post Facial Glow) फेशियल केल्यानंतर महिला अशा काही चुका करतात, ज्यामुळे फेशियलचा फायदा मिळण्याऐवजी साईड इफेक्ट निर्माण होतात. यामुळे त्वचा चमकत नाही, उलट ती अधिक निस्तेज दिसू लागते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही फेशियल कराल तेव्हा या चुका टाळा जेणेकरून तुम्ही साई़ड इफेक्ट्स थांबवू शकाल. (dont do these mistakes after facial if you want to get perfect glow on your skin)

उन्हात जाऊ नका

फेशियल केल्यानंतर उन्हात बाहेर पडू नका, रिअॅक्शन होण्याचा धोका असतो. वास्तविक, फेशियल केल्यानंतर चेहऱ्याची सर्व छिद्रे उघडतात आणि छिद्रे मोठी होतात. अशा स्थितीत कडक उन्हामुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा लाल चट्टे येऊ शकतात.

फक्त ५ व्हेज पदार्थ खाऊन मिळते नॉनव्हेजपेक्षा जास्त प्रोटीन! राहा फिट, टाळा प्रोटिनची कमतरता

फेसवॉश वापरू नका

फेशियल केल्यानंतर तीन ते चार दिवस फेसवॉश न वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण पहिल्या तीन ते चार तासात फेसवॉश किंवा साबणाने चेहरा धुवाल तर यामुळे फेशियलचा प्रभाव राहणार नाही आणि चेहऱ्यावर निस्तेजपणा येईल. जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा धुता तेव्हा चेहऱ्यावर थोडेसे पाणी शिंपडा. याशिवाय चेहऱ्यावर टॉवेल घासण्याची चूक करू नका.

हा' त्रास असलेल्यांनी रात्री चुकूनही दूध पिऊन झोपू नये; तब्येत कधी खराब होईल कळणारही नाही

स्क्रब करू नका

चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी स्क्रब उपयुक्त आहे. पण फेशियल केल्याने डेड स्किन आणि घाण निघून जाते. अशा परिस्थितीत नवीन ऊतक तयार होण्यास दोन दिवस लागतात. त्यामुळे दोन ते तीन दिवस स्क्रब करू नका. यामुळे त्वचा सोलली जाऊ शकते. याशिवाय फेसमास्कही लावू नका. साधारणपणे, फेशियलचा प्रभाव किमान 15 ते 20 दिवस टिकतो.

थ्रेडींग करू नका

जर तुम्हाला थ्रेडिंग करायचं असेल तर फेशियल करण्यापूर्वी किंवा तीन ते चार दिवस आधी करा. फेशियल केल्यानंतर चेहऱ्याची त्वचा खूप मऊ होते. अशा स्थितीत थ्रेडिंग त्वचेला कापू किंवा सोलू शकते.

तीन दिवस मेकअप करू नका

फेशियल केल्यानंतर किमान तीन दिवसांपर्यंत कॉस्मेटिक उत्पादने चेहऱ्यावर वापरू नयेत. खरं तर, फेशियल केल्यानंतर छिद्र उघडतात, अशावेळी या उत्पादनांमध्ये असलेली रसायने त्वचेत जातात. यामुळे तुमचा चेहरा तर खराब होतोच, पण त्वचेलाही नुकसान होते.
 

Web Title: Post facial care tips : Dont do these mistakes after facial if you want to get perfect glow on your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.