Join us  

कच्च्या बटाट्यात दडलंय उजळ त्वचेचं सिक्रेट, बटाट्याच्या रसात मिसळा एक गोल्डन गोष्ट; चेहरा उजळेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 2:38 PM

Potato for Face - Benefits & Face Pack of Potato : काळे डाग, पिगमेंटेशन होईल कमी, बटाट्याच्या रसाचा वापर चेहऱ्यावर कसा करावा? पाहा

सणवार कोणताही असो, प्रत्येकाकडे बटाट्याची भाजी (Potato for Skin) केली जाते. बटाट्याचा खवय्यावर्ग खूप मोठा आहे. कोणत्याही पदार्थात बटाटा घालताच, त्या पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. बटाट्याची भाजी, भजी, आमटी, पराठा, खिचडी आपण खाल्लीच असेल. पण बटाट्याचा वापर कधी चेहऱ्यासाठी करून पाहिलंय आहे का? आता तुम्ही म्हणाल पदार्थात वापरण्यात येणारा बटाटा चेहऱ्याला उजळ कसा काय करू शकतो?

बटाट्यामध्ये जीवनसत्व क असते. व्हिटॅमिन क कोलेजन तयार करते (Skin Care Tips). ज्यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्व, सुरकुत्या यासह पिंपल्सच्या डागांपासून सुटका मिळते. शिवाय त्यात अॅझेलाईक अॅसिड असते. जे त्वचेला उजळ करणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा करावा? पाहा(Potato for Face - Benefits & Face Pack of Potato).

चेहऱ्यासाठी बटाट्याच्या रसाचे फायदे

- बटाट्यात आयर्न, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविनचा समृद्ध स्रोत असते. ज्यामुळे वृद्धत्वाच्या खुणा कमी होतात. शिवाय सुरकुत्यांपासूनही सुटका मिळते.

- बटाट्याचा रस हे एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. यामुळे सैल पडलेली त्वचा घट्ट होते. यासह हट्टी टॅन काढून टाकते.

- चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावल्याने सनबर्न, काळे डाग, बारीक रेषा आणि निस्तेज त्वचा यासह इतर त्वचेच्या संबंधित समस्या सुटतात.

आंघोळ केल्यानंतर चुकूनही करू नका ४ चुका, स्किन खराब होण्याचे महत्वाचे कारण; आणि...

- बऱ्याचदा डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुरकुत्यांमुळे चेहऱ्यावरील तेज कमी होते. जर उजळ त्वचा हवी असेल तर, चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावा.

- मुरुमांचे डाग सहसा लवकर जात नाही. हे घालवण्यासाठी बटाट्याचा रस उपयुक्त ठरेल. यासाठी कोणताही फेसमास्क तयार करताना त्यात बटाट्याचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा.

चेहऱ्यावर बटाट्याचा रस कसा लावावा?

साहित्य

बटाट्याचा रस

मध

अशा पद्धतीने तयार करा फेसमास्क

चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग, सुरकुत्या, सैल झालेली स्किन, तेलकट त्वचा यासह इतर स्किनच्या निगडीत संबंधित समस्या सोडवण्यासाठी आपण या फेसमास्कचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत ३ चमचे बटाट्याचा रस घ्या. त्यात मध मिसळून पेस्ट तयार करा.

धकधक गर्ल माधुरी दीक्षितसारखं चेहऱ्यावर येईल तेज, रोज फक्त १ गोष्ट चेहऱ्याला लावा

चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावर थेट लावा. आपण ही पेस्ट मानेवर देखील लावू शकता. पेस्ट लावल्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावर तयार पेस्ट १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आपण या फेसमास्कचा वापर आठवड्यातून ४ वेळा करू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी