आजकाल लोक कमी वयात केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत (Hair Care). केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, केसात कोंडा, यासह केसांच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात (Potato Juice). केस गळणे ही मुख्य समस्या आहे. केस जर जास्त प्रमाणात गळत असतील तर, केसांवर बटाट्याचा वापर करून पाहा (Hair Fall). बटाट्याचा वापर आपण अनेक भाज्यांमध्ये करतो.
बटाट्याचे अनेक पदार्थ केले जातात (Home remedy). बटाट्याची भाजी चविष्ट लागते. पण याचा वापर आपण कधी केसांसाठी करून पाहिलं आहे का? बटाट्याच्या रसामध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. ज्यामुळे स्किन आणि केसांना अधिक फायदा होतो. जर आपल्याला केसांना निरोगी ठेवायचं असेल तर, बटाट्याच्या रसाचा वापर करून पाहा(Potato Home Remedy for Hair Fall and Hair Thinning).
बटाट्यामध्ये हे पोषक घटक आढळतात
बटाट्यामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, यासोबतच बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, बी, सी, ई आणि के आणि पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखी खनिजे देखील असतात. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
बटाट्याचा रस कसा बनवायचा आणि कसा लावायचा?
एक मध्यम आकाराचा बटाटा धुवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात त्याचा रस तयार करा. बटाट्याचा रस एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात कापसाचा गोळा बुडवून केसांच्या मुळांवर लावा. हा रस केसांना सुमारे २० मिनिटे लावून ठेवा. नंतर शाम्पूने केस धुवा. आपण केसांना बटाट्याचा रस आठवड्यातून २ वेळा लावू शकता. काही महिन्यातच फरक दिसेल.
केस खूपच पातळ - कायम गळतात? ब्यूटी एक्सपर्ट सांगतात ३ हेअर मास्क; केसांची वेणी दिसेल दाट
केसांच्या समस्येवर बटाट्याचा रस गुणकारी
केसांना चमकदार बनवते
बटाट्याच्या रसामुळे केसांना नवी चमक मिळते. यामुळे केस अधिक घनदाट आणि सुंदर दिसू लागतात. केसांची हरवलेली चमक पुन्हा येते.
हेअर ग्रोथसाठी मदत
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फॉस्फरस, बीटा कॅरोटीन आणि नियासिन आढळते. बटाट्याचा रस स्काल्पचे पोषण करते. ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते.
केस गळती रोखते
बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन बी आणि सी असते. जे केसांच्या मुळांना मजबूत करते. ज्यामुळे केस गळणे थांबते.
पावसाळ्यात चेहऱ्यावर दह्यात १ सोनेरी गोष्टी मिसळून जरूर लावा; मुरुमांचे डाग - टॅनिंग होईल गायब
स्काल्प हेल्दी ठेवते
बटाट्याच्या रसामध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असते. जे स्काल्पवरील डेड स्किन, तेल आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. जे स्काल्पवरचा कोंडा दूर करते.