Lokmat Sakhi >Beauty > 'या' भाजीचा रस चेहऱ्याला लावा-चेहरा उजळेल आणि पिंपल्स गायब होतील झरझर कायमचे

'या' भाजीचा रस चेहऱ्याला लावा-चेहरा उजळेल आणि पिंपल्स गायब होतील झरझर कायमचे

Potato Juice For Pimples Removal : बटाट्याचा रस  रात्री झोपताना गालांवर लावल्यानं सकाळीपर्यंत चेहरा क्लिन आणि क्लिअर होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 12:09 PM2024-09-11T12:09:06+5:302024-09-12T18:58:27+5:30

Potato Juice For Pimples Removal : बटाट्याचा रस  रात्री झोपताना गालांवर लावल्यानं सकाळीपर्यंत चेहरा क्लिन आणि क्लिअर होईल.

Potato Juice For Pimples Removal : How To Remove Pimples Using Potato Juice | 'या' भाजीचा रस चेहऱ्याला लावा-चेहरा उजळेल आणि पिंपल्स गायब होतील झरझर कायमचे

'या' भाजीचा रस चेहऱ्याला लावा-चेहरा उजळेल आणि पिंपल्स गायब होतील झरझर कायमचे

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या पुरूषांपेक्षा महिलांना जास्त उद्भवते. याचे कारण हॉर्मोन्स आहे जे मासिक पाळी, मेनोपॉज आणि प्रेग्नंसीदरम्यान अव्यवस्थित होतात. याव्यतिरिक्त जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंही ताण-तणाव येतो. जे पिंपल्ससाठी कारणीभूत ठरते. (Potato Juice For Pimples Removal) पिंपल्स काढून  टाकण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं आहे. हा प्रभावी  घरगुती उपाय करून तुम्ही एका दिवसांत पिंपल्सपासून सुटका मिळवू शकता. बटाट्याचा रस  रात्री झोपताना गालांवर लावल्यानं सकाळपर्यंत चेहरा क्लिन आणि क्लिअर होईल. (Pimples Will be removed From Cheeks in 1 Day Apply One Drop Juice Of This Vegetable Before Sleeping at Night)

काया क्लिनिकच्या रिपोर्टनुसार बटाट्यात नॅच्युरल कम्पाऊंड्स असतात ज्यामुळे मेलेनिन प्रोडक्शन कमी होण्यास मदत होते. पिग्मेंटेशन डार्क स्पॉर्ट्स, डिस्ककलरेशन, हायपरपिग्मेंटेशन रोखण्यास मदत होते. रोज बटाट्याचा वापर चेहऱ्यावर केल्यानं त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. १ बटाटा, २ टेबलस्पून बेसन आणि अर्ध्या लिंबाचा रस हे मिश्रण चेहऱ्याला लावा ज्यामुळे त्वचा ब्राईट होण्यास मदत होईल.

नजर धुसर झाली-चष्मा नको वाटतो? तुपात हा पदार्थ मिसळून  खा; दृष्टी सुधारेल-स्पष्ट दिसेल

बटाट्याच्या रसात एंटी एक्ने प्रॉप्रटीज असतात.बटाट्याचा रस एक नॅच्युरल आणि प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे त्वचेच्या समस्या खासकरून पिंपल्स दूर करण्ययास मदत होते. बटाट्यात व्हिटामीन सी, एंटीऑक्सिडेटंस आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या टाळण्यास मदत होते.  ज्यामुळे पिंपल्स सुकतात आणि सूज कमी होण्यास मदत होते आणि चेहरा ताजा-तवाना राहतो. 

सगळ्यात आधी ताजा बटाटा घ्या. बटाटा व्यवस्थित धुवून सोलून घ्या. सोललेला बटाट्याचे लहान-लहान काप करून एका ब्लेंडरमध्ये घाला. बटाटा व्यवस्थित वाटल्यानंतर एका सुती कापडाच्या मदतीने त्याचा पूर्ण रस काढून घ्या आणि एका हवाबंद डब्ब्यात ठेवा.

पाय बारीक मांड्या खूप जाड? डॉक्टर सांगतात रोज 'इतका वेळ' चाला, स्लिम दिसतील मांड्या

बटाट्याचा रस काढल्यानंतर एका स्वच्छ कॉटन बॉलच्या मदतीने हा रस चेहऱ्याला लावा. पिंपल्स असलेल्या या रसाने मसाज करा. हा रस लावल्यानंतर रात्रभर तसाच राहू द्या. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्याने धूळ, घाण निघून जाण्यास मदत होते.

त्वचा उजळते आणि  चेहऱ्यावर तेज येतं. बटाट्याचा रस गारवा प्रदान करतो. यामुळे नैसर्गिक स्वरूपात  त्वचा हायड्रेट राहते आणि आराम मिळतो. बटाट्याच्या रसाचा नियमित उपयोग केल्याने चहेऱ्यावरील डाग, पिग्मेंटेनशन कमी होण्यास मदत होते. 

Web Title: Potato Juice For Pimples Removal : How To Remove Pimples Using Potato Juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.