चेहऱ्यावर पिंपल्स (pimples) येऊन जातात. पण नंतर मात्र त्यांचे काळे डाग (dark spots) कित्येक दिवस चेहऱ्यावर तसेच असतात. सुरुवातीला अगदी गडद दिसणारे हे डाग हळूहळू मग अस्पष्ट होत जातात. पण ते जाण्यासाठी खूपच दिवस, कधी कधी तर महिने लागतात. असा डार्क स्पॉट्स (How to reduce dark spots?) असणारा चेहरा मुळीच चांगला दिसत नाही. शिवाय अनेक जणींना जाणवणारी आणखी एक समस्या म्हणजे त्वचेचा रंग वेगवेगळा असताे. त्यामुळे कपाळावरची, डोळ्यांच्या बाजुची, हनुवटीच्या खालची त्वचा काळवंडलेली दिसते तर गाल त्या मानाने उजळ दिसतात. असा त्वचेचा अनईव्हन टोन (uneven skin tone) कमी करण्यासाठी तसेच चेहऱ्यावरचे काळे डाग घालविण्यासाठी पोटॅटो टोनर (potato toner) हा घरगुती उपाय (home remedies) करून बघा.
पोटॅटो टोनर करण्यासाठी....साहित्य१ लहान बटाटा, अर्ध्या लिंबाचा रस, १ टी स्पून ॲलोव्हेरा जेल, गुलाबपाणी, स्प्रे बॉटल.
स्मार्ट, आकर्षक दिसण्यासाठी पैसेच लागतात असं नाही... 6 सोप्या ट्रिक्स आणि दिसा स्मार्ट- सुंदरकृती (How to make potato toner at home?)- सगळ्यात आधी बटाट्याची सालं काढून घ्या आणि तो किसून त्याचा रस काढून घ्या.- तुम्हाला ४ ते ५ टेबलस्पून एवढा तरी बटाट्याचा रस मिळाला पाहिजे.- एका वाटीमध्ये हा रस घ्या. त्यात ॲलोव्हेरा जेल, लिंबाचा रस आणि ४ ते ५ टेबलस्पून गुलाबपाणी टाका.- हे मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर पोटॅटो टोनर झालं तयार.
- हे टोनर तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता.- जर डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतील, तर तो त्रास कमी करण्यासाठीही तुम्ही हे टोनर वापरू शकता. फक्त त्यासाठी त्यात लिंबाचा रस टाकू नका. - दिवसातून २ वेळा हे टोनर वापरण्यास हरकत नाही.
पोटॅटो टोनर वापरण्याचे फायदे (Benefits of applying potato toner)- बटाट्यामध्ये त्वचेचा काळवंडलेपणा दूर करणारे नैसर्गिक घटक असतात. त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो.- निस्तेज झालेली त्वचा चमकदार करण्यासाठी हे टोनर उपयुक्त ठरते.- चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स बंद करण्यासाठी फायदेशीर- चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल शोषले जाते आणि त्वचा अधिक फ्रेश दिसते. - सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त. कारण त्यातील ॲलोव्हेरा जेल स्किन टाईटनिंगसाठी मदत करते.- चेहऱ्यावरचे तेल कंट्रोल झाल्यामुळे आपोआपच पिंपल्सचा त्रासही कमी होतो. आणि चेहरा स्वच्छ, नितळ राहण्यास मदत होते.