Lokmat Sakhi >Beauty > सततच्या केस गळतीने हताश झालात ? करा सोपा ‘पोटली मसाज’, केस गळणं थांबेल लवकर...

सततच्या केस गळतीने हताश झालात ? करा सोपा ‘पोटली मसाज’, केस गळणं थांबेल लवकर...

Potli Massage Therapy: How It Works and How It Can Help For Hair Growth : दाट सुंदर मऊ केसांसाठी उत्तम उपाय, करा हा खास मसाज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 10:15 PM2023-09-26T22:15:01+5:302023-09-26T22:34:26+5:30

Potli Massage Therapy: How It Works and How It Can Help For Hair Growth : दाट सुंदर मऊ केसांसाठी उत्तम उपाय, करा हा खास मसाज...

Potli Massage Therapy To Promote Hair Growth. | सततच्या केस गळतीने हताश झालात ? करा सोपा ‘पोटली मसाज’, केस गळणं थांबेल लवकर...

सततच्या केस गळतीने हताश झालात ? करा सोपा ‘पोटली मसाज’, केस गळणं थांबेल लवकर...

लांबसडक, केळभोर, घनदाट केस हे आपल्या सौंदर्याचा एक मुख्य भाग आहे. बिघडलेली जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेकजण केस गळतीच्या समस्येने हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत, बहुतेक महिला केसांचे सौंदर्य सुधारण्यासाठी अनेक प्रकारे केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. कधीकधी ही उत्पादने महाग असतात आणि आपल्याला हवा तास योग्य परिणाम देत नाहीत. खरंतर केस गळाणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळण्याच्या समस्यांमागे अनेक कारणे आहेत जसे की, हार्मोनलस बदल, तणाव, संसर्ग याचबरोबर जर ही समस्या लवकर बरी झाली नाही तर टक्कल पडणे, वारंवार केसगळती होणे यांसारख्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात(Potli Massage Therapy To Promote Hair Growth).

आपले केस लांबसडक, चमकदार आणि सुंदर असावेत असं कोणाला वाटत नाही. लहान केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन महाग पॅकेज खरेदी करतो. पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतातच असं नाही. जर हे सर्व न करताही केस लांब करता येऊ शकतात तर ? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. आपल्या घरीच असे काही केस वाढवण्याचे उपाय आहेत, ज्यामुळे केस लांबसडक वाढण्यास मदत होते. काही घरगुती पदार्थांचा वापर करून आपण केसांना पोटली मसाज देऊन, आपल्या केसांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा मिळवू शकतो(Potli Massage Therapy: How It Works and How It Can Help For Hair Growth).

केसांसाठी पोटली मसाज, काय आहे हा नवीन प्रकार ? 

पोटली मसाजसाठी लागणारे साहित्य :- 

१. लवंग - १० ते १२ 
२. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 
३. मेथी दाणे - १ टेबलस्पून 
४. बदामाचे तेल - १० टेबलस्पून 
५. ऑलिव्ह ऑईल - १० टेबलस्पून 

घरच्या घरी पार्लरसारखी बोटॉक्स ट्रिट्मेंट् करण्यासाठी सोपी ट्रिक, त्वचेवरील सुरकुत्या, एजिंगचे मार्क्स होतील नाहीसे...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये लवंग, पांढरे तीळ, मेथी दाणे घेऊन त्याची एकत्रित मिक्सरला लावून बारीक पूड करून घ्यावी. 
२. त्यानंतर एका मोठ्या तोंडाच्या बाटलीत बदाम व ऑलिव्ह ऑईल समप्रमाणात घ्यावे. 
३. आता मलमलच्या कापडाचा एक छोटा तुकडा घेऊन त्यात लवंग, पांढरे तीळ, मेथी दाणे यांची बारीक केलेली पूड ओतून त्याची एक छोटी पोटली तयार करून घ्यावी. 
४. आता ज्या बाटलीमध्ये आपण बदाम व ऑलिव्ह ऑईल घेतले आहे त्या बाटलीच्या तोंडाशी ही छोटीशी पोटली ठेवून त्यावरुन बाटलीचे झाकण लावून घ्यावे. 

केस गळाल्याने कपाळ खूप मोठे दिसते ? कपाळावरची केस गळती थांबवण्यासाठी १ सोपा उपाय...

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फॉलो करा नाइट हेअर केअर रुटीनचे ५ नियम..केसांचे सौंदर्य टिकेल कायम..

पोटली मसाज करण्याची योग्य पद्धत :- 

१. केस कंगव्याने व्यवस्थित विंचरुन केसांतील गुंता काढून घ्यावा. त्यानंतर बरोबर मधोमध भांग पाडून केसांचे दोन भागांत विभाजन करुन घ्यावे. 
२. आता बाटलीतील तेलात भिजवून ठेवलेल्या पोटलीने केसांच्या मुळांशी मसाज करुन घ्यावा. 
३. ही पोटली आपण तेलात बुडवून हलकेच आपल्या स्कॅल्पवर आणि केसांच्या मुळांजवळ फिरवून घ्यावे. 
४. असे केल्याने आपल्या केसांना पोटलीतील असलेल्या लवंग, पांढरे तीळ, मेथी दाणे तसेच बदाम व ऑलिव्ह ऑईल यातील पोषक तत्व मिळून केस वाढण्यास मदत होईल. 

केसांच्या वाढीसाठी पोटली मसाज करण्याचे फायदे :-     

१. लवंगमधील बुरशीनाशक आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे केसांना इंफेक्शन्स होत नाहीत.   

२. मेथी दाण्याच्या वापराने स्कॅल्पच्या ब्लड सर्क्युलेशनला मदत होते आणि केसांची वाढ होते.

३. केसांसाठी पांढऱ्या तिळाचा वापर केल्यास त्यांचा कोरडेपणा दूर होतो तसेच हरवलेली चमक पुन्हा येते. 

४. बदामाच्या तेलाचा वापर केल्याने केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होते. 

५. केसांसाठी उत्तम  कंडिशनर म्हणून ऑलिव्ह ऑईलचा उपयोग होतो. यामध्ये असणारे इमोलिएंट हे नैसर्गिक कंडिशनर स्वरूपात काम करतात. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळून केस अधिक मऊ आणि मुलायम होतात.

Web Title: Potli Massage Therapy To Promote Hair Growth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.