Join us  

७ फूट लांब केस असलेल्या महिलेने फक्त ४ घरगुती गोष्टी वापरत राखली केसांची निगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 1:53 PM

Prayagraj's Smita Srivastava with longest hair gets Guinness World Record certification : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या, सर्वात लांब केस असलेल्या भारतीय महिलेने पाहा कशी घेतली केसांची काळजी

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (Guiness Book of World Records) हे पुस्तक जगभरातील अनोख्या गोष्टींना अव्वल स्थान आणि यथोचीत सन्मान करते. हे दरवर्षी प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांची दखल घेऊन माहिती देण्यात येते. हे पुस्तक विविध श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. तर, याच्या जगातील सर्वात लांब केसांच्या विभागात भारतीय महिलेच्या केसांच्या विक्रमाची नोंद करण्यात आलीय.

ही महिला उत्तर प्रदेशातील एका खेड्यात राहणारी असून, तिला जगातील लांब केस या श्रेणीत पहिला पुरस्कार मिळाला आहे. ती महिला नक्की कोण? (Hair Care Tips) तिने आपल्या केसांची काळजी कशी घेतली? पाहूयात(Prayagraj's Smita Srivastava with longest hair gets Guinness World Record certification).

उत्तर प्रदेशातील महिलेचे "जगातील सर्वात लांब केस"

नुकतंच भारताने "जगातील सर्वात लांब केस" या कॅटगरीत मेडेन पुरस्कार जिंकला आहे. यूपीच्या प्रयागराज येथील रहिवासी स्मिता श्रीवास्तव यांना हा पुरस्कार मिळाला असून, त्यांचा हा सन्मान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने केला आहे. ४६ वर्षीय स्मिताच्या केसांची लांबी ७ फूट ९ इंच इतकी आहे. कोणा व्यक्तीचीही इतके लांब केस नसतील, इतकी तिच्या केसांची लांबी आहे. भारतासाठी हा विश्वविक्रम होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. स्मिताला त्याचे प्रमाणपत्र ऑक्टोबर महिन्यातच मिळाले होता. पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने नुकतीच ही माहिती आपल्या वेबसाइटवर शेअर केलीय.

चेहऱ्यावर छोटे दाणे-मुरुमांच्या डागांमुळे त्रस्त? ३ घरगुती उपाय, चेहरा होईल क्लिन-मिळेल नैसर्गिक ग्लो

एवढे लांबसडक केसांची निगा कशी राखली?

या विश्वविक्रमानंतर आनंद व्यक्त करताना स्मिता म्हणाली, "मला भारताच्या वतीने हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. मला हे निरोगी केस माझ्या आईकडून मिळाले आहेत. वयाच्या १४ व्या वर्षापासून मी माझे केस वाढवत आहे. माझ्या केसांवर मी कधीही शाम्पूचा वापर केला नाही. मी माझ्या केसांची निगा नैसर्गिक उत्पादनांच्या वापराने राखते. केसांची निगा राखताना रीठा, शिकेकाई, आवळा आणि कांद्याच्या रसाचा वापर करते.'

केसांसाठी रीठा, शिकेकाई, आवळा आणि कांद्याच्या रसाचे फायदे

रीठा

रीठा एक औषधी वनस्पती आहे. हे औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. केसांना मऊ आणि सुंदर करण्यासाठी रीठाचा वापर केला जातो. रीठा केसगळती रोखण्यास मदत करते. हे नैसर्गिकरित्या कार्य करते. यात लोह, अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मेटोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, रीठा एक उत्कृष्ट क्लिनिंग एजंट आहे, जो आपल्या केसांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवते.

शिकेकाई

आयुर्वेदानुसार शिकेकाई ही एक अशी जडीबुटी आहे, जी केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. शिकेकाईचे वैज्ञानिक नाव अकाशिया कॉन्सिना आहे. शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन डी सारखे अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात. जे केसांना मजबूत करतात.

आवळा

आवळा फक्त शरीरासाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे कोलेजन वाढण्यास मदत होते. केसांच्या मजबूत वाढीसाठी कोलेजन आवश्यक आहे.

सकाळी उठलं की उशीवर केसच केस? रात्री नकळत घडणाऱ्या ४ चुकांमुळे होतो हेअर फॉल, केस गळतात कारण..

कांद्याचा रस

केस निरोगी, मजबूत आणि घनदाट होण्यासाठी लोक कांद्याच्या रसाचा वापर करतात. कांद्याच्या रसामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात, जे केसांना खोलवर पोषण देण्यास मदत करतात. केसांची वाढ, केस गळणे, कोंडा, केस तुटणे आणि केसांशी संबंधित इतर समस्या सुटतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी