मेकअप तर सगळ्याच जणी करतात. पण काही जणींचा मेकअप खूपच नॅचरल दिसतो. तर काही जणींचा मेकअप म्हणजे चेहऱ्यावर नुसते वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचे थर दिल्यासारखे वाटतात. असा मेकअप केलेला चेहरा तर दिवसा उजेडी आणखीनच कसातरी दिसतो. तुमच्याही मेकअपचं असं होत असेल तर नॅचरल लूक येणारा मेकअप कसा करायचा, याविषयीच्या या काही टिप्स पाहून घ्या (3 must do things before you put on make-up). मेकअप करण्यापुर्वी या काही गोष्टी न विसरता करा (Diwali makeup)... मग बघा ऐन दिवाळीत तुमचाही मेकअप कसा परफेक्ट होतो आणि चेहऱ्यावर कसा छानसा ग्लो येतो ते (How to do make up for getting natural look?)....
मेकअप करण्यापुर्वी ३ गोष्टी करा...
१. क्लिनअप
मेकअप करण्यापुर्वी आपण चेहरा धुतोच. यात काहीच नविन नाही. पण मेकअप करण्यापुर्वी चेहरा धुण्यासाठी कोमट पाणी वापरा. पाणी खूप थंड नको आणि एकदम कडकही नको.
दिवाळीत दिव्यांसोबत फोटो काढता पण कधीच चांगले येत नाहीत? ७ सोप्या पोझ, लाइक्सचा पडेल पाऊस
कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा खूप छान पद्धतीने हायड्रेटेड होते. चेहरा धुण्यासाठी हरबरा डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ आणि त्यात थोडा मध आणि कच्चं दूध हे मिश्रण वापरा. चेहर छान चमकेल.
२. आईस मसाज
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर चेहऱ्याला आईस मसाज द्यायला विसरू नका.
फटाके फोडताना दुखापत होऊ नये म्हणून ८ गोष्टींची काळजी घ्या, दिवाळीत संकट टाळा
आईस मसाज देण्यासाठी जो बर्फ वापराल तो फ्रिजमधून बाहेर काढून ठेवल्यानंतर एखाद्या मिनिटाने वापरा. तसेच बर्फ थेट चेहऱ्यावर लावू नका. आधी एका कापडात गुंडाळा आणि नंतर तो कपडा चेहऱ्यावरून फिरवा.
३. टोनिंग
चेहरा धुतला की अनेक जणी लगेच चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावतात आणि मेकअप सुरू करतात.
४५ लाखांचा ड्रेस आणि ३ लाखांची पर्स! शाहरुख खानची लेक सुहानाची महागडी स्टाईल पाहा..
पण चेहऱ्याला माॅईश्चराईज करण्यापुर्वी त्यावर टोनर लावणं गरजेचं आहे. टोनरऐवजी तुम्ही गुलाबजलही वापरू शकता. यानंतर चेहरा मॉईश्चराईज करा आणि मगच प्रायमर लावून मेकअपला सुरूवात करा.