Lokmat Sakhi >Beauty > ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? स्वयंपाकघरातील हा पदार्थ लावा; डाय न वापरता काळे होतील केस

ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? स्वयंपाकघरातील हा पदार्थ लावा; डाय न वापरता काळे होतील केस

Premature gray hair Solution : डाय केल्यानंतर केस पुन्हा पुन्हा पांढरे होतील की काय अशी भिती अनेकांना वाटते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 03:11 PM2023-09-25T15:11:23+5:302023-09-25T17:51:44+5:30

Premature gray hair Solution : डाय केल्यानंतर केस पुन्हा पुन्हा पांढरे होतील की काय अशी भिती अनेकांना वाटते.

Premature gray hair Solution : Home Remedies for Premature gray hair white hairs solution | ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? स्वयंपाकघरातील हा पदार्थ लावा; डाय न वापरता काळे होतील केस

ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? स्वयंपाकघरातील हा पदार्थ लावा; डाय न वापरता काळे होतील केस

कमी वयात केस पिकणं (Premature gray hair)  ही सध्याची खूपच कॉमन समस्या आहे. केसांच्या वाढीसाठी, केस काळे  करण्यासाठी बाजारात बरेच शॅम्पू, कंडिशनर्स उपलब्ध आहेत. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. पिकलेल्या केसांना पुन्हा काळे करण्यासाठी डाय तर काहीजण हेअर कलर करतात.  डाय केल्यानंतर केस पुन्हा पुन्हा पांढरे होतील की काय अशी भिती अनेकांना वाटते. केस  काळे करण्यासाठी कोणते सोपे घरगुती उपाय करता येतील पाहूया. (Home Remedies for Premature gray hair)

केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय कोणता?

सगळ्यात आधी पाण्यात १० ते १५ मिनिटांसाठी चहा पावडर उकळण्यासाठी ठेवा. एका भांड्यात १ चमचा आवळा पावडर, २ चमचे हिना, २ चमचे भृंगराज पावडर घाला. त्यात चहाचं पाणी घाला. चहाचे पाणी घातल्यानंतर मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या अर्धा ते १ तासाठी हे मिश्रण तसेच ठेवून नंतर डोक्याला लावा. 

यावेळी केसांना तेल असू नये. केस व्यवस्थित धुवून सुकलेले असावेत. जेणेकरून चांगला रिजल्ट दिसेल. ४० ते ४५ मिनिटं हे मिश्रण केसांना लावून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंग येईल आणि केस कोणत्याही केमिकल्सच्या संपर्कात येणार नाहीत.

केस पांढरे होण्यापासून कसं रोखायचं?

1) कोरडे केस बऱ्याच केसांच्या समस्यांना आमंत्रण देतात म्हणून केस चांगले राहण्यासाठी नियमित ऑयलिंग करणं गरजेचं आहे. यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि नैसर्गिक रंग टिकून राहतो.

2) आवळा खायला हवा. सगळ्यात ऋतूत आवळ्याचे नियमित सेवन केल्याने केस नैसर्गिकरित्या काळे राहतात. रोज बीट खाल्ल्यानेही पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. बीटाच्या सेवनाने केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो. तुम्ही केसांना लाल रंग देण्यासाठी मेहेंदीमध्येही बीटाचा रस मिसळू शकता. 

चेहरा उजळ-फ्रेश दिसतो पण मान-पाठ काळी? १ सोपा उपाय- चटकन उजळेल मान-पाठ

3) केसांसाठी दही सुद्धा फायदेशीर ठरते. सगळ्यात आधी दही आणि टोमॅटो एकत्र वाटून घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस आणि निलगिरीचं तेल मिसळा. आठवड्यातून २ वेळा या तेलाने मालिश करा. या उपायाने केस काळे, दाट राहण्यास मदत होईल.

रोज गळून केस विरळ झाले? महिनाभर ८ पदार्थ खा, भराभर वाढतील केस, दाट-शायनी दिसतील

4) आल्याचा वापर करून तुम्ही केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. यासाठी एक चमचा आल्यात ऑलिव्ह ऑईल मिसळून ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. काही दिवसात तुमचे केस काळे- दाट होतील.
 

Web Title: Premature gray hair Solution : Home Remedies for Premature gray hair white hairs solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.